पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये भाजपकडून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.
भाजपने कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शैलेश टिळक यांची नाराजी उघडपणे दिसून आली. शैलेश टिळक म्हणाले, आम्ही आधीही भूमिका मांडली आहे. पक्षाने जर आमच्या घरात तिकिट दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण ते झालं असतं तर मुक्ता टिळक यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असती. मुक्ता टिळक यांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली असती. पण ठीक आहे पक्षाने विचार करून निर्णय घेतला असावा, त्यामुळे आम्ही त्या निर्णयाला विरोध करत नाही.
पक्षाच्या विरोधात जाणार नाही
शैलेश टिळक यांना उमेदवारी न मिळाले ते वेगळी भूमिका घेतील, असे म्हटले जात होते. मात्र, या शक्यतांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी म्हटले की, ‘आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षासोबत राहणार आहोत’.