Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका

अदानींच्या प्रगतीशी मराठी माणसांना काही देणंघेणं नाही, त्यांचे मूलभूत प्रश्न कालच्या शिवतीर्थावरील सभेत अनुत्तरीत राहिले, असा टोला महाजन यांनी लगावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 12, 2026 | 07:44 PM
'बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?' प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

'बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?' प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका
  • ठाकरेंच भाषण मराठी माणसाला भ्रमित करणारं
  • शिवतीर्थावर कौटुंबिक नाट्य सोहळा झाला
ठाणे: मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठी माणसांच्या प्रश्नांवर कोणतीही योजना सादर न करता गौतम अदानींची प्रगती पुस्तक मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठा माणसाला भ्रमित केलं, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अदानींच्या प्रगतीशी मराठी माणसांना काही देणंघेणं नाही, त्यांचे मूलभूत प्रश्न कालच्या शिवतीर्थावरील सभेत अनुत्तरीत राहिले, असा टोला महाजन यांनी लगावला.

महाजन म्हणाले की, काल शिवतीर्थावर कौटुंबिक सोहळा झाला. त्यात राज ठाकरेंचे भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा उत्तम नमुना होता. कालच्या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचे केलेले काम निंदनीय असल्याचे ते म्हणाले. घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी केलेला हा खटाटोप होता, असा घणाघात महाजन यांनी ठाकरेंवर केला. राज ठाकरे भाषणात अदानींवर घसरले, अशी टीका महाजन यांनी केले. जे अदानी शरद पवारांना मार्गदर्शक मानतात. अदानी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी भोजनासाठी जातात. मग राज ठाकरेंनी अदानींवर केलेली टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल महाजन यांनी यावेळी केला. अदानींनी मागील १०-१२ वर्षात प्रगती केली, या राज ठाकरेंच्या दाव्यावर महाजन म्हणाले की राज यांच्या मातोश्री बिल्डरची प्रगती केव्हा झाली. तो त्यांनी आठवायला हवा. युतीची सत्ता असताना मातोश्री बिल्डरची प्रगती झाली. त्यावेळेस राज यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणले होते. पंचवीस वर्षात तुमची किती प्रगती झाली याचं राज ठाकरेंनी स्मरण करायला हवं, असे महाजन म्हणाले.

Railway Breaking: प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करताय? ‘या’ 16 विशेष गाड्या करण्यात आल्या रद्द

उबाठा मनसे जागा वाटपात संदीप देशापांडेला सोबत घेऊ नका अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती, मात्र काल संदीप देशपांडे यांना भाषणाची संधी देणं हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड असल्याचे महाजन म्हणाले. संदीप देशांपाडे याने कालच्या भाषणा ठाकरे ब्रॅंड नाही असे म्हटलं नंतर तो ब्रॅंड नाही तर विचार आहे, असे सांगून देशपांडेने सारवासारव केली, असे महाजन म्हणाले. महापालिका निवडणुकीत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रॅंडचा नसून विचारांचा आहे, अशी मखलाशी देशपांडेने केल्याचे महाजन म्हणाले. मराठी माणसांची काळजी घ्यायला देवेंद्र फडणवी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे असे अनेक नेते आहेत. ठाकरेंकडे मराठी माणसाचा ठेका दिलेला नाही, अशी टीका महाजन यांनी केली.

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

Web Title: How will showing adani progress solve the problems of marathi people prakash mahajan on raj thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Prakash Mahajan
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
1

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
2

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
3

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
4

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.