
BJP, Shivsena, Pune News, PMC Election, Ravindra Dhangekar,
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून जागावाटपात रवींद्र धंगेकर यांची कोंडी होत आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. जागावाटपावरून महायुतीत पेच वाढत चालला आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजपकडून आम्हाला देत असल्याचा आरोप धंगेकरांकडून केला जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. तर युतीत आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा, अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान झाला पाहिजे, फक्त आमच्याच नव्हे तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यंला मान सन्मान मिळाला पाहिजे, या हेतूने काल आमच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर उदय सामंत यांनाही भेटलो, पुण्यातील कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेले तर निवडणुका कोणासाठी लढवायच्या असा सवालही धंगेकर यांनी उपस्थित केला. भाजपने शिवसेनेला दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, भाजपकडून देण्यात आलेल्य जागांवर आजपर्यंत भाजप किंवा शिवसेनेचा कोणताही उमेदवार निवडून आलेला नाही. त्या जागा घेऊन आम्ही काय करणार,असाल सवालही त्यांनी उपस्थित केला.
Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक
रवींद्र धंगेकर म्हणाले, आमच्या जागा आम्ही ठरवणार, आमचे उमेदवारही आम्हीच ठरवणार, पण आमचे उमेदवार पण तेच ठरवणार असतील, जागाही तेच ठरवणार असतील तर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यात आम्हाला नेत्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही काल रात्री एकनाथ शिंदे यांना भाजपसोबतची अशी युती शिवसेनेच्या राजकीय भविष्यासाठी घातक असल्याचे म्हटलं आहे. त्यापेक्षा आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या बाजुने निर्णय घेतला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, अंतिम निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावना ओळखूनच पक्ष नेतृत्व भूमिका घेईल, असे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना न्याय मिळणे आवश्यक असून, तो सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची असून, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे मतही धंगेकर यांनी व्यक्त केले.