Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावावर मुलांची जबाबदारी सोपवत बहिणीने धरणात मारली उडी, बीडमधल्या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस पडले बुचकळ्यात

जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.

  • By साधना
Updated On: May 24, 2023 | 11:52 AM
pali dam beed

pali dam beed

Follow Us
Follow Us:

बीड: आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed) घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. (Beed News)

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
“मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर”, असं सांगण्यासाठी महिलेने आपल्या भावाला फोन केला आणि धरणात उडी मारून आत्महत्या केली.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या आत्महत्ये मागचं कारण शोधताना पोलीस बुचकळ्यात पडले.  जिजाबाई जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असं मृत महिलेचं नाव आहे.

कोणालाही काहीही न सांगता धरणावर पोहोचल्या जिजाबाई
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपवलं. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

एका महिलेने पालीच्या धरणात उडी घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धरणाकडे धाव घेतली. तोपर्यंत जिजाबाई यांचे नातेवाईक पालीच्या धरणावर पोहचले होते. स्थानिक आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.  जिजाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

जिजाबाई जोगदंड यांनी घरात कोणालाही काहीही न सांगता पाली धरण गाठलं. धरणावर पोहचताच त्यांनी आपल्या मोबाईलवरून भावाला फोन केला. “मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर,” असं सांगत त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे त्यांच्या भावाने तात्काळ याची माहिती जिजाबाई यांच्या घरातील लोकांना आणि इतर नातेवाईकांना दिली. जिजाबाईंचे कुटुंबीय आणि नातेवाईक धरणाजवळ पोहोचेपर्यंत जिजाबाई यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Woman committed suicide in beed by jumping in dam nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 11:41 AM

Topics:  

  • maharashtra
  • आत्महत्या
  • बीड

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.