
तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई
गडचिरोली : महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. राज्यातील लाखो महिलांचा यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला मिळत आहे. अजूनही महिला योजनेसाठी नोंदणी करत आहेत. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे. मात्र, मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली असून, शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा : “… जर फरक नाहीच पडला तर तुतारी वाजवू”; रामराजे निंबाळकरांचा ‘या’ कारणामुळे महायुती सोडण्याचा इशारा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरूवात करत प्रत्येक महिलेला दर महिन्याला १५०० रुपये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी मुदत होती. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरवात केली. मात्र, यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे.
जुलै, ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली.
नोंदणी यापुढेही सुरुच राहणार
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून, ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र, ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : “आता ‘झामुमो’ केवळ पतीपत्नीचा… ”; चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशावर शिवराजसिंग चौहान यांचे मोठे वक्तव्य