Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Zilla Parishad: ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! पुणे जिल्हा परिषदेची वैद्यकीय मदत आता २५ हजारांवर

परराज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत मंजूर निधी संबंधित रुग्णालयांच्या बँक खात्यात थेट वर्ग (डायरेक्ट फंड ट्रान्सफर) करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक तसेच प्रशासकीय धावपळ कमी होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 04:41 PM
Pune ZP Supplementary Budget 333 Crore 2026

Pune ZP Supplementary Budget 333 Crore 2026

Follow Us
Follow Us:
  • गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दिली जाणारी वैद्यकीय आर्थिक मदत १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
  • कर्करोग, हृदयविकार, लिव्हर अथवा किडनी प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मिळणारी आर्थिक मदत
  • जिल्हा परिषदेकडील वैद्यकीय मदतीत झालेली वाढ आणि परराज्यातील उपचारांसाठी थेट निधी वर्ग करण्याचा निर्णय
Pune Zilla Parishad: ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दिली जाणारी वैद्यकीय आर्थिक मदत १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आली असून, परराज्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी थेट निधी वर्ग करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषद गटनेते तथा सदस्य श्रीमंत ढोले यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली.

Priyanka Chaturvedi: ‘ते ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन…’; खासदारांच्या फोडाफोडीवर प्रियंका चतुर्वेदीचे मोठे विधान

नवीन निर्णयानुसार कर्करोग, हृदयविकार, लिव्हर अथवा किडनी प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मिळणारी आर्थिक मदत आता २५ हजार रुपये असेल. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

याशिवाय, परराज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत मंजूर निधी संबंधित रुग्णालयांच्या बँक खात्यात थेट वर्ग (डायरेक्ट फंड ट्रान्सफर) करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक तसेच प्रशासकीय धावपळ कमी होणार आहे.

या निर्णयाबद्दल श्रीमंत ढोले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांचे आभार मानले.

Indian Ocean Dipole म्हणजे काय? El Nino ला देणार टक्कर; जाणून घ्या भारतावर काय परिणाम होणार?

“ग्रामीण भागातील एकही गरीब रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. प्रशासनाने या मागणीचे गांभीर्य ओळखून सकारात्मक निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना संकटकाळात मोठा आधार मिळेल,” अशी प्रतिक्रिया श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेकडील वैद्यकीय मदतीत झालेली वाढ आणि परराज्यातील उपचारांसाठी थेट निधी वर्ग करण्याचा निर्णय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.

 

Web Title: Pune zilla parishad medical help increased to 25 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • pune news
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
3

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.