Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत ‘कहीं खुशी, कहीं गम’; ७३ पैकी ३७ जागांवर झेडपीत महिला राज !

सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2022 | 05:04 PM
सातारा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत ‘कहीं खुशी, कहीं गम’; ७३ पैकी ३७ जागांवर झेडपीत महिला राज !
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लाॅटरी लागली असून, सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत.

गुरुवारी येथील नियोजन भवनामध्ये एक तास उशिरा आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण प्रक्रियेत १९ जागांचे इतर मागास प्रवर्गाचे तर पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे ३७ जागांवर महिला आरक्षण निश्चित झाले. या आरक्षणांची जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती. 73 पैकी 8 गट अनुसूचित जाती मागास प्रवर्ग व एक गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. या आरक्षण सोडतीत फलटण तालुक्याची चांदी झाली. येथील सर्वच आठ गट खुले झाल्याने राजे गटाला पुन्हा मोठी संधी प्राप्त झाली आहे.

आरक्षण सोडत आधी मागास प्रवर्गनंतर इतर मागास प्रवर्ग या टप्प्याने काढण्यात येऊन उरलेले गट खुले झाल्याचे जाहीर करण्यात आले. सोडतीमध्ये महिला आरक्षणाचा इतका बोलबाला असताना एकही महिला या आरक्षण सोडतीला उपस्थित नव्हती.

जिल्हा परिषद आरक्षण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे –

1) कराड तालुका – अनुसुचित जाती – कोपर्डे हवेली (महिला), येळगाव (महिला), तांबवे. नागरिकांचा मागास प्रवर्ग- उंब्रज, चरेगांव (महिला), विंग (महिला), सैदापूर, वडगाव हवेली (महिला), रेठरे बु, सर्वसाधारण प्रवर्ग- पाल (महिला), मसूर, वारूंजी (महिला), कार्वे (महिला), काले (महिला).

2) सातारा तालुका – अनुसुचित जाती- कोडोली, नागरिकांचा मागास प्रवर्ग- खेड (महिला), कोंडवे, कारी (महिला), पाडळी, सर्वसाधारण प्रवर्ग- लिंब (महिला), पाटखळ (महिला), देगांव (महिला), नागठाणे (महिला), अपशिंगे.

3) फलटण तालुका सर्व सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण – कोळकी (महिला), वाठार निं (महिला), तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी), सांगवी, विडणी, गुणवरे, बरड, हिंगणगाव.

4) खंडाळा तालुका – नागरिकांचा मागास प्रवर्ग- भादे (महिला), खेड बु., सर्वसाधारण प्रवर्ग – शिरवळ (महिला).

5) कोरेगाव तालुका – अनुसुचित जाती- सातारारोड, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पिंपोडे बु सर्वसाधारण प्रवर्ग- वाठार स्टेशन (महिला), कुमठे, एकंबे, वाठार किरोली (महिला).

6) वाई तालुका – अनुसुचित जाती- केंजळ, बावधन, नागरिकांचा मागास प्रवर्ग- अोझर्डे, सर्वसाधारण प्रवर्ग- पसरणी, भुईंज.

7) महाबळेश्वर तालुका – सर्वसाधारण प्रवर्ग- तळदेव (महिला), भिलार (महिला).

8) जावली तालुका – नागरिकांचा मागास प्रवर्ग- कुडाळ, कुसुंबी (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग- म्हसवे (महिला),

9) पाटण तालुका – अनुसुचित जाती- मल्हारपेठ (महिला), नाटोशी (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग- गोकुळ तर्फ हेळवाक (महिला), मुद्रुळकोळे (महिला). सर्वसाधारण प्रवर्ग- तारळे, म्हावशी (महिला), मारूल हवेली, धामणी (महिला).

10) माण तालुका – सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गसाठी – आंधळी (महिला), बिदाल (महिला), मार्डी, गोंदवले बु, कुकुडवाड.

11) खटाव तालुका – नागरिकांचा मागास प्रवर्ग- सिध्देश्वर कुरोली (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग- औंध (महिला), बुध, पुसेगाव, खटाव, निमसोड, पुसेसावळी, मायणी.

Web Title: Women rule in satara zilla parishad 37 out of 73 seats reservation draw released nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 05:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.