Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार

केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 07:52 AM
'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार

'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. अशा काही महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लाडकी बहीण योजनेच्या तीन महिन्यांचा 4500 रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार दिला. या योजनेअंतर्गत १५०० रुपये मदत दिली जात असून, या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुती सरकारला झाल्याचेही बोलले जात आहे. केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले.

हेदेखील वाचा : …म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?

तसेच, नियम आणि अटी डावलून करण्यात आलेल्या अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत.

पोर्टलवर तक्रार करूनही दखल नाहीच

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र, सध्या ई-केवायसी करूनही अनेक महिलांना अनुदानापासून वगळण्यात आले आहे. त्यात सरकारच्या अधिकृत पोर्टलवर त्यासंबंधी तक्रार करूनही कोणतीही दखल अथवा प्रतिसाद दिला जात नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांना अनुदान नेमके कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याची माहिती मिळू शकत नाही. परिणामी, हजारो बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

Web Title: Women will get 4500 rupees for three months in a single payment in ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 07:52 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न होणार साकार; सरकारने रेडी रेकनर दर ठेवले स्थिर
1

महाराष्ट्रात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न होणार साकार; सरकारने रेडी रेकनर दर ठेवले स्थिर

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, होणार चांगला फायदा…
2

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, होणार चांगला फायदा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.