Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

Drought News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२६ मधील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण ५१ हजार १०५ शेतकऱ्यांच्या २६,५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून, सध्या क्षेत्राच्या सत्यापनाची प्रक्रिया सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 09:45 PM
Drought Inspection

Drought Inspection

Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचनामे पूर्ण
  • नुकसानग्रस्त शेतीचा अहवाल शासनाकडे सादर
  • सत्यापन प्रक्रिया सुरू; पात्र शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
 

सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण ५१ हजार १०५ शेतकऱ्यांच्या २६ हजार ५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. या नुकसानीचा एकत्रित अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला आहे. आता बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची प्रक्रिया सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसांत ती पूर्ण होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. (Drought News)

जिल्ह्याचा समावेश ट्रिगर-१ मध्ये झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यांची कार्यवाही करण्यात आली. महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागांनी समन्वय साधत नुकसानग्रस्त शेतीची माहिती संकलित केली.

दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण, कणकवली, देवगड, वेंगुर्ला आणि कुडाळ या आठ तालुक्यांतील बाधित क्षेत्राची नोंद पूर्ण करण्यात आली आहे. पीकनिहाय माहितीचे वर्गीकरण करून शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक बाधित क्षेत्र

कुडाळ तालुक्यात १३ हजार ३५८ शेतकऱ्यांचे ८ हजार ९६०.२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये हे सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे.

मालवण तालुक्यात ७ हजार ७५७ शेतकऱ्यांचे ४ हजार ७३३.२७ हेक्टर, तर कणकवली तालुक्यात ८ हजार ७१२ शेतकऱ्यांचे ४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

सावंतवाडी तालुक्यात ६ हजार ४६६ शेतकऱ्यांचे ३ हजार २४५.२९ हेक्टर, देवगडमध्ये ६ हजार २९० शेतकऱ्यांचे १ हजार ९६९.१९ हेक्टर आणि वैभववाडीत ३ हजार ८७३ शेतकऱ्यांचे १ हजार ३९१.५९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे.

दोडामार्गमध्ये १ हजार ७३० शेतकऱ्यांचे ७४९.५० हेक्टर, तर वेंगुर्ल्यात २ हजार ९१९ शेतकऱ्यांचे ९८०.६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

पंचनामे पूर्ण झाले असले तरी मदतीची प्रक्रिया अद्याप सत्यापनाच्या टप्प्यात आहे. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता सत्यापन प्रक्रिया पूर्ण होण्याकडे आणि शासनाकडून मदतीबाबत होणाऱ्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी प्रत्यक्ष मदतीची रक्कम आणि वितरणाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एकूण ५१ हजार १०५ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

  • Que: सिंधुदुर्गात एकूण किती हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे?

    Ans: जिल्ह्यातील एकूण २६ हजार ५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

  • Que: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

    Ans: सध्या बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची प्रक्रिया सुरू आहे. सत्यापन आणि शासनाच्या निकषांनुसार पात्रता निश्चित झाल्यानंतर मदतीबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत वितरणाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Web Title: Drought news sindhudurg crop damage panchnama farmers kharif 2026 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • drought news
  • Maharashtra Government
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
1

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
2

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय
3

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
4

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.