Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good News ! राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रूपये लवकरच मिळणार; उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

डॉ. गोऱ्हे यांनी सरकारी पैशांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. प्रामाणिक लोकांनी यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 18, 2025 | 09:32 AM
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणारच

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणारच

Follow Us
Close
Follow Us:

परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेतून महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे गरजू महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल. मात्र, विरोधक याबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

उपसभापती नीलम गोऱ्हे या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्या होत्या. शनिवारी त्यांनी परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. याप्रसंगी परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू

डॉ. गोऱ्हे यांनी सरकारी पैशांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. प्रामाणिक लोकांनी यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे स्पष्ट केले. महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध शिबिरे घेत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

सभासद मोहीम राबवण्याच्या सूचना

पक्षातील पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसंपर्क वाढविण्यासाठी दोन दोन हजार लोकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. जुन-जुलै महिन्यामध्ये विविध शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले सोप्या पध्दतीने मिळावे यासाठी समाधान शिबीरे घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Women will soon get rs 2100 says neelam gorhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Neelam Gorhe

संबंधित बातम्या

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं
1

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?
4

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.