मयुर फडके, मुंबई : मार्च महिन्यात दक्षिण मुंबईतील (South Mumbai) वरळी (Worli) जवळ झालेल्या हिट ॲन्ड रन अपघातात (Hit And Run Accident Case) एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असलेल्या राजलक्ष्मी राजकृष्णन (Rajalakshmi Rajakrishnan) यांच्या मृत्यू प्रकरणी (Death Case) अटक (Arrest) करण्यात आलेला आरोपी सुमेर मर्चंटचा (Accused Sumer Merchant) जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला (Bail application sessions court declared fatal on Tuesday).
१९ मार्च २०२३ रोजी सकाळी एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या राजलक्ष्मी रामकृष्णन या वरळीला मॉर्निंग वॉक करत असताना भरधाव गाडीने त्यांना धडक दिली. याप्रकरणी सुमेर मर्चंटला (२३) अटक कऱण्यात आली होती. दंडाधिकारी न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सुमेर मर्चंट सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अतिरीक्त सत्र न्यायाधीश एम. एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली.
[read_also content=”मुंबईत विना हेल्मेट दोन महिला पोलीस स्कूटीवर झाल्या स्वार, फोटो व्हायरल होताच वाहतूक पोलिसाने… https://www.navarashtra.com/viral/two-women-policemen-ride-a-scooty-without-a-helmet-in-mumbai-the-picture-went-viral-and-the-traffic-police-nrvb-383601.html”]
गाडी चालवित असताना काही न दिसल्यामुळे (ब्लाईंड स्पॉट) पीडिता राजलक्ष्मी यांना धडक दिल्याचा दावा मर्चंटकडून कऱण्यात आला. मात्र, मर्चंट ताशी ९५ ते १०० किमी वेगाने गाडी चालवत होता आणि घटनास्थळ अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे माहीत असूनही त्याने गाडी वेग कमी केला नाही असा युक्तिवाद करून पोलिसांनी याचिकेला विरोध दर्शविला.
न्यायालयासमोर दाखल केलेल्या लेखी जबाबात पोलिसांनी पुढे नमूद केले की, रक्ताच्या नमुन्याच्या अहवालानुसार आरोपीच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमध्ये १३७ मिलीग्राम होते, जे मर्यादेपेक्षा जास्त आहे. तसेच दंडाधिकाऱ्यांनी मर्चंटचा अर्ज फेटाळताना प्रकऱणातील पुरावे आणि छायचित्रे यांवरून अपघाताच्या ठिकाणी कोणताही ब्लाईंड स्पॉट नसल्याचे नमूद केल्याचेही पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि सुमेर मर्चंटचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
[read_also content=”विराट कोहलीच्या मुलीला धमक्या देणाऱ्याच्या विरोधातील गुन्हा रद्द, कोहली- अनुष्काकडून आरोप वगळण्यास संमती मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/case-against-viranushka-virat-kohlis-daughters-threat-quashed-hc-verdict-after-anushka-kohli-gets-consent-to-drop-charges-nrvb-383586.html”]
राजलक्ष्मी राजकृष्णन या वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास चालत होत्या. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे कार या महिलेला धडकली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली. कार या महिलेला मागून धडकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे महिला दूरवर फेकली गेली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले.