फोटो सौजन्य: @MahindraXUV700 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये महिंद्रा आपल्या दमदार एसयूव्हीसाठी ओळखली जाते. कंपनीने आतापर्यंत अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा कार लाँच केली आहे, ज्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनी त्यांच्या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये आणणार आहे.
महिंद्रा आपली लोकप्रिय मिड-साइज SUV XUV 700 चे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. सुरुवातीपासूनच ग्राहकांमध्ये या मॉडेलला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, कंपनी आता ते अधिक प्रीमियम बनवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या या कारची टेस्टिंग सुरू असून, यामध्ये होणाऱ्या इंटिरिअर बदलांची आणि नवीन फीचर्सची माहिती समोर आली आहे.
फेसलिफ्टेड Mahindra XUV 700 च्या इंटिरिअरमध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, यात ट्रिपल स्क्रीन सेटअप दिला जाऊ शकतो, जसा महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV मध्ये दिसून आला होता. तसेच नवीन स्टीयरिंग व्हील, कंपनीचा अपडेटेड लोगो, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि अधिक सोयीसाठी ऑटो-डिमिंग IRVM मिळू शकतो. डिझाइनच्या दृष्टीने, यात नवीन LED DRLs, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि रिडिझाईन केलेली ग्रिल देण्यात येणार आहे. या अपडेट्समुळे SUV आधीपेक्षा अधिक मॉडर्न आणि प्रीमियम दिसेल.
रिपोर्ट्सनुसार, फेसलिफ्टेड XUV 700 मध्ये इंजिनचे पर्याय पूर्वीसारखेच राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच, ग्राहकांना पुन्हा पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजिन ऑप्शन्स मिळतील. मोठे बदल फक्त फीचर्स आणि डिझाइन मध्ये केले जातील, ज्यामुळे ही SUV आणखी आकर्षक ठरणार आहे.
नवीन रंग आणि दमदार टेक्नॉलॉजीसह Toyota Camry Hybrid Sprint Edition लाँच
महिंद्राने या फेसलिफ्ट मॉडेलच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अंदाजानुसार पुढील काही आठवड्यांत ही SUV भारतीय बाजारात सादर होऊ शकते. किंमतीबाबत बोलायचे झाले तर, विद्यमान मॉडेलच्या तुलनेत ₹30,000 ते ₹60,000 इतकी वाढ अपेक्षित आहे.
Mahindra XUV 700 फेसलिफ्ट मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये उतरणार असून, तिचा थेट मुकाबला Tata Safari, MG Hector आणि Jeep Compass सारख्या लोकप्रिय SUV सोबत होईल. आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियरमुळे, फेसलिफ्टेड XUV 700 ग्राहकांसाठी आणखी एक दमदार पर्याय ठरू शकतो.