Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra political : यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार! १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत करणार प्रवेश

यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2025 | 01:44 PM
यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार! १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत करणार प्रवेश (फोटो सौजन्य-X)

यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार! १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत करणार प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय राठोड उपस्थित होते. लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षांचे १० हजार कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचा हल्लाबोल; महावितरण कर्यालयासमोर ठिय्या आंदोलन

आज शिवसेनेत नेर नगरपालिकेचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, माजी नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, नगरसेविका दर्शना इंगोले, उबाठाचे अल्पसंख्याक आघाडीमा माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपचे पदाधिकारी तेजस ठाकरे, उबाठाचे सवनाचे पदाधिकारी रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री असताना राज्यात विकासाची कामे केली. लाडकी बहिण, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले. या कामाची पोचपावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचा चारी मुंड्या चीत केले. ज्यांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत होती, ती धुळीस मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महायुतीची दुसरी टर्म वेगाने काम करत आहेत. त्यामुळेच उबाठा, काँग्रेस आणि इतर पक्षातील शेकडो लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर विश्वास ठेवून येत आहेत, असे ते म्हणाले. दिल्ली दौऱ्यावर असताना देखील यवतमाळमधील पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात हे सर्व कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी राहिले, याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.

पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत

पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेते पक्ष प्रवेश करणार आहेत. यवतमाळमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विदर्भातील किमान १० हजार कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.

Mira Bhayander : परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारला संप ; अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय

Web Title: Yavatmal seven municipal councilors joined the party in the presence of deputy chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
1

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
2

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात
4

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.