रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे साहेब होणार… अशा आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विविध वॉट्सअप ग्रुप,वॉट्सअप स्टेटस्,फेसबुक पेज वर ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी आग्रह धरला आहे.
त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी सायंकाळी सागर बंगल्यावर नाम. नारायण राणे यांनी भेट घेतली. तसेच शुक्रवारी शिवसेनेचे इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसकर यांच्या सोबत जाऊन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून ना.नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब येत्या दोन होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.