शाश्वत पर्यावरणासाठी युवकांची वृक्षारोपण मोहीम
कल्याण: कल्याणमध्ये शाश्वत पर्यावरणासाठी राहुल खरे आणि मित्रपरिवारातर्फे वृक्षारोपण मोहिम राबवण्यात आली आहे. आणेगावच्या रायते येथे वनविभागाच्या जागेत ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १७५ जांभुळ आणि पेरू या रोपांचं रोपण करण्यात आलं आहे. निसर्गाचा ढासळता स्तर आणि वाढतं प्रदुषण या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असल्याने ही मोहिम राबविण्यात आल्याची माहिती राहुल खरे यांनी दिली आहे. वनविभाग अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. वृक्षारोपण मोहिमेवेळी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
हेदेखील वाचा- अनेक वर्षापासून नादुरुस्त गटाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून केलं! नागरीकांनी मानले आभार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण येथील राहुल खरे आणि मित्रपरिवारातर्फे आणेगाव, रायते येथे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान १७५ जांभुळ आणि पेरूच्या रोपांचं रोपण करण्यात आलं आहे. जगभरात पर्यावरणाचा स्तर ढासळत आहे. त्यामुळे या समस्येवर वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय आहे. याचा विचार करता राहुल खरे आणि त्यांच्या मित्रापरिवारातर्फे वृक्षरोपण मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असुन विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले युवक या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरवर्षी राहुल खरे आणि त्याचा संपूर्ण मित्रपरिवार वनविभागाच्या वेगवेगळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहेत. यंदाही वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर आणेगाव, रायते जवळच्या वनविभागाच्या मोकळ्या जागेत राहुल खरे आणि मित्रपरिवारातर्फे १७५ जांभुळ आणि पेरूच्या रोपांचं रोपण करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या ३६ वर्षांच्या संघर्षाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार; पत्रकार मित्र असोसिएशनचा इशारा
धीरज पाटील यांनी सांगितले की, शहरातल्या धावपळीच्या जगण्यात आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाला पुर्णपणे विसरत आहोत. यानिमित्ताने आम्हाला आपल्याच भविष्याच्या दृष्टीने निसर्गासाठी काम करण्याची संधी मिळते याचा आम्हाला आनंद आहे. या मोहिमेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून रिसतर परवानगी घेण्यात आली आहे. त्यानंतर आणेगाव, रायते जवळच्या वनविभागाच्या मोकळ्या जागेत १७५ जांभुळ आणि पेरूच्या रोपांचं रोपण करण्यात आलं आहे. निसर्गाचा ढासळता स्तर आमि वाढतं प्रदुषण या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असल्याने ही मोहिम राबविण्यात आली आहे.
तर या वृक्षारोपणावेळी आकांक्षा केनी यांनी सांगितलं की, आम्ही फक्त झाडे लावुन थांबणार नाहीत, तर त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करणार आहे. सप्तेश आहिरे यांनी या उपक्रमाचं नियोजन करत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. वृक्षारोपण मोहिमेवेळी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.