Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काचेचा ग्लास फोडला म्हणून तरुणाची हत्या; बेदम मारहाण केली अन् नंतर झुडपात…

सुरज घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. जखमी अवस्थेत झुडूपात पडून असल्याची माहिती मिळताच सौरभ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2025 | 04:06 PM
तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या

तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु असलेले खुनाचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी वाडी ठाण्यांतर्गत पुन्हा एक खुनाची घटना पुढे आली आहे. दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणातून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यात त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सूरज सुभाष भलावी (वय 27, रा. सोनबानगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. सूरज हा गेल्या काही दिवसांपासून दारूभट्टीत येऊन दादागिरी करत कर्मचाऱ्यांना त्रास देत होता. पोलिसांनी सूरजचा भाऊ सौरभच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून 9 जणांना अटक केली आहे. संदीप श्रीहरी चव्हाण (वय 35, रा. सोनबानगर), प्रभाकर अंबादास चिंतामणी (वय 49, रा. शिवाजीनगर झोपडपट्टी, वाडी), रोहित सुखदेव वरखडे (34) रा. चंद्रमणीनगर, बाबुलखेडा, हरीश दयाराम बानिया (56) रा. दिव्यनगरी, मानकापूर, विशाल दिवेकर (45) रा. न्यू कैलाशनगर, अजनी, पियूष दिवेकर (40), सुनील गोटे रा. भगवाननगर, गोपाल जयस्वाल रा. बेसा आणि कुणाल मेंढे (45) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध दरोड्याची तयारी, घरफोडी आणि आर्म्स अॅक्टसह 3 गुन्हे नोंद आहेत. तो नेहमी खडगाव मार्गावरील सायरेच्या देशी दारूच्या अड्ड्यावर जात होता. मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो भट्टीत गेला. दारू पिल्यानंतर त्याने काचेचा ग्लास फोडला. यामुळे भट्टीचा व्यवस्थापक व इतर आरोपी नाराज झाले. त्यांनी फटकारले असता सूरजने त्यांना शिवीगाळ सुरू केली. कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करत जमिनीवर पाडले.

बेशुद्धावस्थेत झुडपात फेकले

आरोपी त्याला उचलून बाहेर घेऊन गेले आणि जवळच असलेल्या नालीच्या झुडूपात फेकले. बराच वेळपर्यंत सूरज तेथेच जखमी अवस्थेत पडून होता. दरम्यान, तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सूरज जखमी अवस्थेत झुडूपात पडून असल्याची माहिती मिळताच सौरभ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. बुधवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Web Title: Youth murdered for breaking a glass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Youth Murder

संबंधित बातम्या

Nagpur News  : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल
1

Nagpur News : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य
2

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन
3

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.