Yugendra Pawar Engagement: पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर घुमणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. तनिष्का नावाच्या तरुणीसोबत त्यांचा साखरपुडा पार पडला असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी या आनंदाच्या क्षणांची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार आणि तनिष्कासोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. पवार कुटुंबातील या आनंदाच्या बातमीने चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
Political News : हिंदी भाषेच्या शासन निर्णयाची पेटणार होळी; राज्यात जोरदार बसणार राजकीय चटके
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा पाड पडला होता. त्यानंतर आता युगेंद्र पवार हेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर घुमत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा तनिष्का प्रभू हिच्यासोबत नुकताच पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर युगेंद्र आणि तनिष्कासोबतचा फोटो शेअर करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ही मुंबईची असून तिचं शिक्षण परदेशात झाले आहे. तिने फायनान्स या शाखेत उच्च शिक्षण घेतले आहे. दोघांचा साखरपुडा एका खासगी समारंभात पार पडला असून लवकरच त्यांच्या विवाहसोहळ्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात युगेंद्र पवारांचा वाढदिवसाच्या दिवशी खासदार शरद पवार यांनी वाढदिवशी आशीर्वाद देताना अक्षता टाकायची संधी कधी देताय? आता जास्त लांबवू नका, असा गमतीशीर सल्लाही दिला होता. यानंतर काल (२८ जून) युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा पार पडला.
SBI सह ‘या’ बँकांमधील FD वर मिळत आहे ८.५० टक्क्यांपर्यंत व्याजदर, पहा संपूर्ण यादी
युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. २२ एप्रिल १९९१ रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या क्षेत्रात युगेंद्र यांनी उल्लेखनीय प्रगती केली असून त्यांनी अमेरिकेतील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी येथून फायनान्स आणि इन्शुरन्स या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
सध्या युगेंद्र पवार हे शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय, विद्या प्रतिष्ठान या नामवंत शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणूनही त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी आहे.युगेंद्र पवार सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देण्याच्या उपक्रमांमुळे ते अनेक शेतकऱ्यांशी थेट जोडले गेले आहेत. ग्रामीण भागातील शेती आणि पाणी समस्या समजून घेऊन त्यांनी विविध विकासकामे राबवली आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागात कुस्तीला चालना देण्याचे काम ते मनापासून करत असून युवकांमध्ये उत्साह आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.