Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप!

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका महिलेवर जबरदस्तीचा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला. नोकरीच्या आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने सांगितलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 05:14 PM
abhishek kalamkar

abhishek kalamkar

Follow Us
Follow Us:
  • ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’पक्षाचे कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप
  • नोकरीचं आमिष दाखवून केलं भयंकर कृत्य
  • भयंकर प्रकारानंतर व्हिडीओ काढला अन्…
Ahilyanagar Crime News: सभ्य, शांत अशी काहीशी प्रतिमा असलेले माजी महापौर तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा MIDC पोलिसात दाखल झाला आणि जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कळमकर फरार झाले असून त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.’शाळेत नोकरीला लावून देतो’, असे अमिष दाखवून कळमकर यांनी अत्याचार केला अशी फिर्याद एका महिलेने दिली आहे. नगर आणि शिरूर (जि. पुणे) येथे हे कृत्य केल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे. हा दावा करत तिने व्हिडीओ कॉलचे काही स्क्रीन शॉट पुराव्या दाखल पोलिसांना दिले.

माजी आमदार व ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे असलेले अभिषेक महापालिकेत सर्वात तरूण महापौर होते. तसेच मागील विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षाकडून लढविली. पीडित युवती शिरूर तालुक्यातील असून, अहिल्यानगर येथील MIDC पोलिसांकडे तिने पहाटे येऊन ही तक्रार दिली. महिलेने म्हटले, की तीन महिन्यापूर्वी नोकरीच्या शोधात ती अहिल्यानगरमध्ये आली होती.

Vasai Virar: नालासोपाऱ्यात गुंडाची निर्घृण हत्या; 7-8 जणांनी चाकूने केले सपासप वार

नेमका काय घडला प्रकार?

अभिषेक कळमकर याच्या सोशल मीडियावरून संपर्क क्रमांक मिळवत संपर्क केला. परिस्थिती सांगून नोकरीची गरज असल्याचे सांगितले. दोन-तीन दिवसांनी कुष्ठधाम रोडवर भेटायला बोलावले. तिथे कागदपत्र घेत, एमआयडीसीत माझी शाळा आहे, तिथे कामाला लावून देतो, असे सांगितले. ही शाळा बघण्यासाठी बोलवून एका अलिशान वाहनातून विळद घाट येथे नेले. गाडीत आम्ही दोघेच होतो. गाडी हायवे लगत थांबवून थंडपेय दिले. थंड पेय पिल्यानंतर गुंगी आली. त्यावेळी कळमकर आपल्याला स्पर्श करत होता. तिथं वाहनात माझे कपडे काढून जबरदस्ती केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडिओ कॉल केला, अन…

दोन दिवसांनी अभिषेक कळमकर याने व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून, कपडे काढण्यास सांगितले. विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपाची शक्यता

कळमकर घराणे जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. अभिषेक कळमकर स्वतः राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहर जिल्हाध्यक्ष आहेत, तर त्यांचे काका माजी आ. दादाभाऊ कळमकर या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता दाखल झालेल्या या गुन्ह्यामागे राजकीय कारण असल्याचे व त्या नुसार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिरूरच्या हॉटेलमधील रूम नं. ११०

अभिषेक कळमकर याने १८ फेब्रुवारीला कागदपत्र घेऊन शिरूर येथील मारवेल हॉटेलवर बोलावले. नोकरीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून कळमकर याने एका व्यक्तिसोबत हॉटेलमधील रूम नंबर ११० मध्ये पाठवले. तो व्यक्ती तेथून गेल्यावर अभिषेक कळमकर तेथे आला आणि माझ्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकाराचे व्हिडिओ देखील काढले. शरीर संबंधाबाबत कोणाला सांगितल्यास, मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Web Title: Ahilyanagar crime news case registered against ncp sharad pawar faction ahilyanagar district president abhhishek kalamkari for abusing lady

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Ahamadnagar
  • Ahilyanagar
  • crime
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर
2

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.