Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) बारामती नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना बरोबर घेऊन लढणार आहे, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2025 | 11:51 AM
बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार
  • युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
बारामती : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. बारामती नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना बरोबर घेऊन लढणार असून, ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने लढवू, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

यावेळी युगेंद्र पवार म्हणाले की, बारामती शहरातील सामान्यांचे प्रश्न अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहोत. सत्ताधारी पक्षाकडे जे उमेदवार आहेत ते श्रीमंत, धनदांडगे व कॉन्ट्रॅक्टर आहेत. मात्र ते नगरपालिकेत गेल्यानंतर जनतेचे प्रश्न मांडणार नाहीत. मात्र आमच्याकडे जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत, ते सामान्य असले तरी शिक्षित आहेत, त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे. बारामती शहरांमध्ये एका बाजूला विकासाचा दावा केला जात असला तरी दररोज अपघात होत आहेत, यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले. अनेक भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे.

बारामती शहरातील पाणीपट्टी व घरपट्टी जास्त आहे, यासह इतर मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहोत. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ४२ पैकी २० ते २५ उमेदवार असतील, उर्वरित उमेदवार मित्र पक्ष व अपक्ष असतील. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तीन दिवसात आपण जाहीर करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीसाठी तरुणांना जास्त संधी

ही निवडणूक आम्ही बारामतीच्या जनतेसाठी लढविणार आहोत. आमचे उमेदवार हे लोकांमध्ये असलेले उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी आम्ही जास्त करून तरुणांना जास्त संधी दिली आहे. एक महिन्यापूर्वी पवार साहेबांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही ५०% पेक्षा जास्त तरुणांना संधी देणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार आम्ही या निवडणुकीत तरुणांना अधिक संधी दिली आहे. काही प्रभागामध्ये आम्ही अनुभवी लोकांना संधी देणार आहोत.

Web Title: Yugendra pawar has made a big announcement regarding the baramati nagarparishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • baramati
  • Election News
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा
1

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा

बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
2

बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा
3

बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची
4

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.