Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

बारामती नगरपरिषदेचा सन २०२६-२७ साठीचा ५५१ कोटी ७३ लाख ८० हजार रुपयांचा खर्चाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 02:46 PM
बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

Follow Us
Follow Us:
  • बारामती नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सादर
  • नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
  • अनेक आक्षेपार्ह खर्चाबाबत लक्ष वेधले
बारामती : बारामती नगरपरिषदेचा सन २०२६-२७ साठीचा ५५१ कोटी ७३ लाख ८० हजार रुपयांचा खर्चाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर अर्थसंकल्पाच्या या सभेत नवनिर्वाचित नगरसेवकांनी विविध मुद्द्यांवरुन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनेक आक्षेपार्ह खर्चाबाबत विरोधी पक्षनेते आरती शेंडगे यांच्यासह इतर नगरसेवकांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचबरोबर या सभेत घरपट्टी, पाणीपट्टी व विविध करांबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

 

सुनील सस्ते यांनी भाडेकरूंवरील घरपट्टी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत शववाहिका सेवा मोफत करण्याची मागणी केली. यावर , सभेचे अध्यक्ष व नगराध्यक्ष सचिन सातव यांनी शववाहिका मोफत करण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे यांनी शास्ती व सभागृह भाडे विषयावर प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक नीलेश इंगुले यांनी पालिकेच्या गाळ्यांवरील कर आकारणीचा मुद्दा मांडला. नवनाथ बल्लाळ व आरती शेंडगे यांनी आमराई परिसरातील पाणीपुरवठा बंद असतानाही पाणीपट्टी आकारणी होत असल्याचे निदर्शनास आणले.

मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी संबंधित प्रकरणात कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. आपल्या घराभोवती रेन हार्वेस्टिंग तसेच सोलर सिस्टम बसवणाऱ्यांना घरपट्टीमध्ये सवलत देण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी केली. सभेच्या सुरुवातीला गटनेते संजय संघवी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला, यानंतर सर्वांनी दिवंगत नेते अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय व दिव्यांग कल्याण, मियावाकी उद्यान, महिलांसाठी स्वच्छतागृहे, नगरपरिषद शाळांचे डिजिटायझेशन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कर्मचारी वर्गासाठी कॅशलेस आरोग्य विमा, हरित उपक्रमांना मालमत्ता कर सवलत, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन, सफाई कामगारांसाठी आरोग्य व अपघात विमा तसेच महिला सबलीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या जुन्या ठेकेदारांकडील १३ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी बंद घरांवर आकारल्या जाणाऱ्या घरपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली, तर खासगी जेसीबीवर होणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला. सातव यांनी सहा ते सात वर्षे कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे सांगून थकबाकीदारांना हप्त्यांची सवलत देण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच नगरपरिषदेच्या वाहनांच्या वापराबाबत अॅपद्वारे माहिती देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान या सर्वसाधारण सभेत नगरसेवक किरण गुजर, अमर धुमाळ, विशाल हिंगणे, अभिजित चव्हाण, प्रतिभा खरात, अभिजीत जाधव, मनीषा बनकर, दर्शना तांबे, अनुप्रिता ताबे आदींसह इतरांनी विविध मुद्दे मांडले. नगरसेवक जय पाटील यांनी भाडेकरूंच्या सर्व्हेतील अनेक त्रुटींमुळे अनेकांना त्याचा फटका बसत असल्याचे सांगत करआकारणी चुकीच्या पध्दतीने केली जात असल्याचे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नगरसेवकांच्या सुचनांची दखल घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: In baramati municipal council corporators took the administration to task on many issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप
1

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी
2

पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

Vilas Lande On Vikram Kakade : आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी
3

Vilas Lande On Vikram Kakade : आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी

“मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो..,” महिलेच्या विनयभंग प्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
4

“मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो..,” महिलेच्या विनयभंग प्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.