Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक तोंडावर आली असून, महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार निवडून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 01:19 PM
शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची
Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. एकूण 37 जागांपैकी राज्याच्या वाट्याला आलेल्या सात जागांवरून राजकीय समीकरणे रंगली असून, विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत खलबते सुरू आहेत. महाविकास आघाडीत हालचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत.

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, असा सर्वांचा आग्रह असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यासाठी पक्षनेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशीही संपर्क साधून उमेदवारीबाबत चर्चा केल्याचे सुळे यांनी सांगितले. काँग्रेसच्या आमदारांशीही संवाद साधण्यात आल्याचे नमूद करत, दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीसाठी विनंती करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक तोंडावर आली असून, महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार निवडून जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना एक जागा मविआच्या वाट्याला येणार आहे. या जागेसाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला संधी देण्याची आग्रही भूमिका मांडली आहे. पक्षाच्या योगदानाचा विचार करून ही जागा शिवसेनेला मिळावी, असा त्यांचा ठाम सूर आहे.

पवारांच्या नावाला कोणी विरोध करणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरद पवार यांचे नाव पुढे केले जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी “पवारांचं नाव पुढे आल्यानंतर कोणी विरोध करणार नाही,” असे वक्तव्य करत संकेत दिले. पुढील दोन दिवसांत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी पवार मुंबईत येऊन आरोग्य तपासण्या करून काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहितीही दिली. उमेदवारीवर अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार असून, शिवसेनेचा दावा आणि पवारांच्या नावाभोवतीची सहमती यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

हे देखील वाचा : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Web Title: Sharad pawar likely to be elected to rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • political news
  • rajya sabha
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
1

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
2

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
3

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
4

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.