Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी; शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळां’चा विस्तार

तरुणांना पर्यटन क्षेत्राशी जोडण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून युवा पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवा पर्यटन मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत पर्यटनाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 10:12 PM
युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी

Follow Us
Follow Us:
  • तरुणांना पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधींशी जोडण्याचा प्रयत्न
  • शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळे’ स्थापन होणार
  • पर्यटन राजदूतांच्या माध्यमातून भारताच्या पर्यटनाचा प्रचार
 

मुंबई : तरुण पिढीला पर्यटनाशी जोडणे आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे युवा पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. राज्यभरातील अधिकाधिक तरुणांनी सदर धोरणाचा लाभ घ्यावा आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले आहे.

तरुणांमध्ये पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि जबाबदार पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळ’ स्थापन करण्यात आली आहेत. तसेच युवा पर्यटन मंडळाद्वारे ‘युवा पर्यटन राजदूत’ घडविण्यास मदत होत आहे.

युवा पर्यटन मंडळांमधून घडणार पर्यटन राजदूत

युवा पर्यटन धोरणाअंतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालयांमध्ये इयत्ता सातवी आणि त्यापुढील वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळे स्थापन करण्यात येत आहेत. या मंडळांचा उद्देश देशातील पर्यटन, समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती असलेले तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या पर्यटनाचा प्रभावी प्रचार व प्रसार करू शकणारे युवा पर्यटन राजदूत घडविणे हा आहे.

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

या युवा पर्यटन मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये एकत्रित काम, व्यवस्थापन, नेतृत्व आणि सेवा यांसारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होण्यास मदत मिळणार आहे. तरुणांमध्ये जबाबदार व शाश्वत पर्यटनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सदर धोरण महत्त्वपूर्ण ठरत आहे.

याशिवाय, केंद्र शासनाने युवा पर्यटन मंडळांसाठी एक मार्गदर्शिका तयार केली आहे. यामध्ये युवा मंडळाची संकल्पना, उद्दिष्टे, उपक्रम, संघटनात्मक रचना, सदस्यांची भूमिका, जबाबदाऱ्या तसेच इतर आवश्यक मार्गदर्शक सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. युवा पर्यटन मंडळाच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देणे, त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी योगदान देणे, तसेच पर्यटन स्थळांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे.

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

राज्याला पर्यटन क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्यशासन तत्पर

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.)म्हणाले, “राज्याला पर्यटन क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन विविध स्तरांवर सातत्याने काम करत आहे. युवा पर्यटन धोरण हे याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरुणांसह लहान वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हे धोरण राबविण्यात आले आहे. राज्यातील अधिकाधिक शाळा आणि महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन युवा पर्यटन मंडळे स्थापन करावीत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आमचे आवाहन आहे.”

Web Title: Yuva paryatan dhoran tarunanna paryatan kshetrat sandhi maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maharashtra Tourism
  • Tourism news

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
1

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम
2

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश
3

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त
4

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.