Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

शासनाच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडी केंद्राला वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ब्रम्ही बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात वीज मीटर जोडणी होऊनही प्रत्यक्ष वीज वापर सुरू झालेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2026 | 03:08 PM
Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • ब्रम्ही (बु.) येथील अंगणवाडी केंद्रात वीज वापर नसतानाही ८५० रुपयांचे बिल.
  • मीटर जोडणी झाल्यापासून केंद्रात प्रत्यक्ष वीज वापर झालेला नसल्याचा दावा.
  • शून्य वीज वापर असताना बिल आल्याने वीज बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह.
मूर्तिजापूर : तालुक्यातील ब्रम्ही (बु.) येथील अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्षात वीज वापर नसतानाही तब्बल ८५० रुपयांचे वीज बिल आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मीटर जोडणी झाल्यापासून केंद्रात वीज वापरच झालेला नसताना बिल आल्याने वीज वितरण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडी केंद्राला वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ब्रम्ही बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात वीज मीटर जोडणी होऊनही प्रत्यक्ष वीज वापर सुरू झालेला नाही. संबंधित केंद्रात अद्याप आवश्यक विद्युत फिटिंगची व्यवस्था नसल्याने दिवे, पंखे अथवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वीज जोडणी करण्यासही सुमारे एक महिन्याचा विलंब झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मीटरचे रीडिंग शून्य असतानाही ८५० रुपयांचे बिल आकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित मीटर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष वीज वापर, मीटर रीडिंग आणि आकारण्यात आलेले बिल यांची योग्य पडताळणी न करताच बिल आकारले जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे शासन बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रांवर विविध योजना राबवित आहे. दुसरीकडे वापरच नसलेल्या वीज जोडणीचे बिल भरण्याची वेळ येत असेल, तर हा शासकीय निधीच्या विनियोगाचा गंभीर मुद्दा ठरू शकतो. बिलाची रक्कम शासनाच्या तिजोरीतून अदा केली जाणार असली, तरी हा पैसा अखेरीस कररूपाने सामान्य नागरिकांकडूनच जमा झालेला असतो. त्यामुळे केवळ बिल आकारण्यापेक्षा प्रत्यक्ष वीज वापर आणि मीटर रीडिंगची खातरजमा करणे आवश्यक आहे.

इतर अंगणवाड्यांचीही तपासणीची गरज

ब्रम्ही बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्राच्या वीज बिलाची तातडीने तपासणी करून चुकीची आकारणी झाली असल्यास ती दुरुस्त करावी. तसेच तालुक्यातील इतर अंगणवाडी केंद्रांच्या वीज बिलांचीही पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

FAQ

1. अंगणवाडी केंद्राला किती रुपयांचे वीज बिल आले?
ब्रम्ही (बु.) येथील अंगणवाडी केंद्राला ८५० रुपयांचे वीज बिल आले आहे.

2. अंगणवाडी केंद्रात वीज वापर झाला होता का?
मीटर जोडणी झाल्यापासून केंद्रात प्रत्यक्ष वीज वापर झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

3. वीज बिलाच्या आकारणीवर प्रश्न का उपस्थित झाले आहेत?
वीज वापर नसतानाही ८५० रुपयांचे बिल आल्याने बिलाच्या आकारणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Zero electricity consumption yet a bill of 850 rupees arrived nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर
1

अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…
2

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…

अकोल्यात तब्बल 2 लाख 76 हजार मतदारांची नावे बाद; 16 नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध
3

अकोल्यात तब्बल 2 लाख 76 हजार मतदारांची नावे बाद; 16 नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.