
अकोल्यात तब्बल 2 लाख 76 हजार मतदारांची नावे बाद; 16 नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध
अकोला : विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली होती. अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व) आणि मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मिळून एकूण १३ लाख १८ हजार ६५२ मतदारांचा या प्रारूप यादीत समावेश करण्यात आला. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, १६ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या मुदतीत पात्र मतदारांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक नोंदणी अधिकाऱ्यांच्याकडे आपले दावे व आक्षेप नोंदविले. सध्या यासंदर्भातील कागदपत्रे व पुराव्यांची कसून तपासणी सुरू असून, ही कागदपत्र तपासणी १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाकडून एकही हरकत दाखल करण्यात आलेली नाही, असे उपजिल्हाधिकारी परांडेकर यांनी स्पष्ट केले.
Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
या प्रक्रियेत जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार २ मतदारांच्या नावांमध्ये तफावत व त्रुटी आढळून आल्याने संबंधित व्यक्तींना नोटीस बजाविण्यात आल्या. जिल्ह्यात ६ लाख ८३ हजार ४०५ पुरुष, ६ लाख ३५ हजार २१५ महिला आणि ३२ तृतीयपंथी मतदार प्रारूप यादीत समाविष्ट आहे. गणनापत्रक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा न केलेल्या एकूण २ लाख ७६ हजार ९९२ मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. यामध्ये ५१ हजार २६ अनुपलब्ध किंवा गैरहजर, १ लाख ३४ हजार ५८९ कायमस्वरूपी स्थलांतरित, ४६ हजार २७४ मृत, ४४ हजार ४४८ अन्यत्र नोंदणी केलेले किंवा दुबार आणि ६८२ इतर मतदारांचा समावेश आहे. कागदपत्रे तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून, १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या आहे.
स्थलांतरित संख्या सर्वाधिक
वगळण्यात आलेल्या नावांमध्ये ५१ हजार २५ अनुपलब्ध/गैरहजर, १ लाख ३४ हजार ५८९ कायमस्वरूपी स्थलांतरित, ४६ हजार २७४ मृत, ४४ हजार ४४८ अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार आणि ६८२ इतर मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता, एएसडीडी (अनुपलब्ध / स्थलांतरित / मृत /दुबार) यादीत अकोटमध्ये ४१,४४९, बाळापूरमध्ये ३६,०५५, अकोला (पश्चिम) मध्ये ९४,९३९, अकोला (पूर्व) मध्ये ७५,२८८, आणि मूर्तिजापूरमध्ये २९,२६१ अशा एकूण २,७६,९९२ मतदारांच्या नावांचा समावेश आहे.
१३ लाख मतदारांचा प्रारूप यादीत समावेश
प्रारूप मतदारयादीतील नोंदींबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला होता. जिल्ह्यातील मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून १० नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
– महेश परांडेकर, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक विभाग
1. अकोला जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी कधी प्रसिद्ध करण्यात आली?
विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
2. अकोला जिल्ह्यातील किती विधानसभा मतदारसंघांचा या प्रक्रियेत समावेश आहे?
अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
3. प्रारूप मतदार यादीत किती मतदार आहेत?
पाचही विधानसभा मतदारसंघांत मिळून १३ लाख १८ हजार ६५२ मतदारांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आला आहे.