Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…

नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्यामुळे पात्रात सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2026 | 04:42 PM
बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट

Follow Us
Follow Us:
  • बाळापूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली
  • मन, महेश आणि भिकुंड नद्यांची पाणीपातळी रोडावली
  • मन नदीवरील दोन प्रमुख धरणे वगळता बहुतांश तलाव, बंधारे कोरडे
अकोला : ग्रामीण भागासह बाळापूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. तालुक्याला जीवनदायिनी ठरणाऱ्या मन, महेश आणि भिकुंड या मुख्य नद्यांपैकी मन नदीवरील केवळ दोन प्रमुख धरणे वगळता परिसरातील इतर नद्या, छोटे बंधारे आणि तलावांनी तळ गाठला आहे. परिणामी, गावखेड्यांमध्ये तब्बल ८ ते १० दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच नदीपात्रात पाण्याची पातळी रोडावली असताना, संपूर्ण नदीत जलपर्णी वेलींचा विळखा पडला आहे. यातच नुकताच गणेशोत्सव आणि पाठोपाठ नवरात्रोत्सवाचा दांडगा सोहळा पार पडला.

बाळापूर येथील बायपास रोडने राष्ट्रीय महामार्गावरील मन नदीच्या पुलावरून गेल्या दोन दिवसांपासून क्रेनच्या सहाय्याने माँ दुगार्देवीचे विसर्जन करण्यात येत आहे. बाळापूर येथे अकोला जिल्ह्यासह शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातूनही शेकडो गणेश व देवी मंडळ विसर्जनासाठी येत असतात. आधीच तीव्र पाणीटंचाई आणि जलपर्णीमुळे संकटात सापडलेल्या मन नदीपात्रात शेकडो मोठ्या मूर्तीचे विसर्जन झाल्याने परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मूर्तीचा आकार मोठा असणे आणि नदीत आवश्यक तेवढा जलसाठा उपलब्ध नसल्याने अनेक देवींच्या मूर्त्या पाण्यावर तरंगताना किंवा अर्धवट बुडालेल्या स्थितीत दिसून येत आहेत.

Manoj Jarange Patil : टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

तसेच, नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्यामुळे पात्रात सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आमच्या भागात आधीच १०-१० दिवस नळाला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच मन नदी पाण्याची पातळी कमी होतं चालली आहे. विसर्जनामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि निर्माल्य साचले आहे. प्रशासनाने तातडीने वाकडे लक्ष देऊन नदीपात्राची स्वच्छता करावी, अन्यथा येत्या काळात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज

पाण्याचा तुटवडा असतानाही योग्य पर्यायी व्यवस्था न केल्याने भविष्यातील पाणी संकट अधिक गडद होणार आहे. सध्याची ही परिस्थिती पाहता, आगामी उन्हाळ्यात बाळापूर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे, तर दुसरीकडे नद्यांचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. त्यामुळे मन नदीपात्रातील जलपर्णी तातडीने काढणे, विसर्जनस्थळावरील साचलेला निर्माल्य व कचरा साफ करून नदीची स्वच्छता मोहीम राबवणे आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र जनक्षोभ उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

FAQ

1. बाळापूर तालुक्यात सध्या कोणती समस्या निर्माण झाली आहे?
तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

2. बाळापूर तालुक्यातील कोणत्या नद्या महत्त्वाच्या आहेत?
मन, महेश आणि भिकुंड या तीन प्रमुख नद्या तालुक्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

3. तलाव आणि बंधाऱ्यांची स्थिती काय आहे?
मन नदीवरील दोन प्रमुख धरणे वगळता परिसरातील बहुतांश छोटे बंधारे आणि तलावांनी तळ गाठला आहे.

Web Title: Water crisis in balapur taluka is severe nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • akola news
  • Dam Water Level
  • Water supply

संबंधित बातम्या

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?
1

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांत ४३ % जलसाठा, खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा; जलसाठ्यात होतेय घट
2

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांत ४३ % जलसाठा, खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा; जलसाठ्यात होतेय घट

अकोल्यात तब्बल 2 लाख 76 हजार मतदारांची नावे बाद; 16 नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध
3

अकोल्यात तब्बल 2 लाख 76 हजार मतदारांची नावे बाद; 16 नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न
4

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.