Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’मध्ये हॉलिवूडसह बॉलिवूडमधले ‘हे’ ६१ चित्रपट पाहायला मिळणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 29, 2024 | 02:48 PM
'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव'मध्ये हॉलिवूडसह बॉलिवूडमधले 'हे' ६१ चित्रपट पाहायला मिळणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव'मध्ये हॉलिवूडसह बॉलिवूडमधले 'हे' ६१ चित्रपट पाहायला मिळणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?

परदेशातील विशेषत: हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत . पण त्याच वेळी जागतिक स्तरावर गाजत असलेले आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने एशियन फिल्म फाऊंडेशनने थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन सुरू केले. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित केला जात आहे.

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीत आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरिया मधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.

“रोमिओ अँड ज्युलिएट” फेम अभिनेत्री ऑलिव्हिया हसीचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवीनचंद्र दिग्दर्शित ‘झंझारपुर’, प्रबल खुंद दिग्दर्शित ‘पाई तंग’, जदुमनी दत्ता दिग्दर्शित ‘जुईफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी स्पर्धा विभागात आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. आशा (दिग्द. दीपक पाटील), सिनेमॅन (दिग्द. उमेश बगाडे), कर्मयोगी आबासाहेब (दिग्द. अल्ताफ शेख ), जिप्सी (दिग्द. शशी खंदारे), भेरा (दिग्द.श्रीकांत भिडे), मॅजिक (दिग्द. रवी करमरकर), मंडळ आभारी आहे (दिग्द. विद्यासागर अध्यापक), छबिला (दिग्द.अनिल भालेराव) यांचा या स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे.

प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, “निकोप सुदृढ समाजाचा…”

या महोत्सवात सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून आणि पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात येणार आहे.

महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर सुरु झाली आहे. प्रतिनिधी शुल्क रु.१०००/- असून फिल्म सोसायटी आणि विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क रु. ७५०/- असणार आहे.

Web Title: 21st third eye asian film festival to be held from january 10 registration now open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • marathi film

संबंधित बातम्या

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
1

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
2

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
3

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.