"रोमिओ अँड ज्युलिएट" फेम अभिनेत्री ऑलिव्हिया हसीचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ऑलिव्हिया हसी इस्ले हिचं निधन झालं आहे, त्या ७३ वर्षांच्या होत्या. अभिनेत्रीचं निधन २७ डिसेंबर रोजी अभिनेत्रीचे निधन झाले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीतच अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून माहिती दिली आहे.
१९६८ मध्ये रिलीज झालेल्या, फ्रँको झेफिरेलीच्या “रोमिओ अँड ज्युलिएट” चित्रपटात ऑलिव्हिया हसी इस्लेने ज्युलिएटची भूमिका साकारली आहे. ऑलिव्हियाच्या पश्चात तिचा पती डेव्हिड ग्लेन आयस्ली आणि त्यांची तीन मुले ॲलेक्स, मॅक्स आणि इंडिया आहेत. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले की, “आम्ही ऑलिव्हिया हसी इस्ली यांचे निधन झाल्याची घोषणा करत आहोत. ऑलिव्हिया ही एक उल्लेखनीय व्यक्ती होती, तिच्या स्वभावाने ओळखत असलेल्या लोकांना तिच्या निधनाचे बातमीने मोठे दु:ख झाले आहे.”
“रोमिओ अँड ज्युलिएट” ही ब्रिटिश-अर्जेंटाइन अभिनेत्रीसाठी एक यशस्वी भूमिका होती, तिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळवला होता. तिने नंतर १९७४ च्या हॉरर क्लासिक ब्लॅक ख्रिसमसमध्ये अभिनय केला होता. त्यानंतर ती ‘डेथ ऑन द नाईल’मध्येही दिसली होती. हसी इस्लेला २००८ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. पण तिने तात्काळ उपचार घेऊन २०१८ मध्ये पूर्णपणे बरी झाली. अभिनेत्रीने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चित्रपटांची कायमच जोरदार चर्चा होते.