प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, "निकोप सुदृढ समाजाचा…"
राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणावरुन कमालीचं राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी परळी इव्हेंट पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. काल अभिनेत्रीने पत्रकार परिषद घेत काही नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. आता प्राजक्ताच्या समर्थनार्थ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी पोस्ट केली आहे.
शनिवारी प्राजक्ताने पत्रकार परिषदेत विशेषत: महिला कलाकारांची बाजू मांडली. नेतेमंडळींनी त्यांच्या गोष्टीत कलाकारांना मध्ये आणू नये असं ती म्हणाली. शिवाय आमदार सुरेश धस यांनी तिच्यावर केलेले आरोप पूर्णत: खोटे असल्याचे तिने स्पष्ट केलं. आता यानंतर तिच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वानी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सचिन गोस्वामी म्हणतात, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो, तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे.. क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.”
या प्रकरणावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही माध्यमासोबत बोलताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. गौतमी पाटील म्हणाली की, “प्राजक्ताताई तुम्ही जे काही बोललात ते सर्व बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार तुमच्यासोबत आहोत. मी देखील एक कलाकार आहे. त्यामुळे मलाही तुम्हाला विनंती करायची की एखाद्या कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या, त्याला कोणत्याही नेत्यासोबतच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचे नाव जोडू नका. तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा. तुम्ही कलाकाराच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही प्रेक्षक आमच्यावर प्रेम करता. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तू या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू अशीच पुढे जात राहा. हसत राहा आणि खूप छान राहा,” असे गौतमी पाटील म्हणाली आहे.
परंपरा आणि गूढतेचा संगम असणारा “रुखवत” चित्रपट कसा आहे ?
अभिनेत्री प्राजक्ता माळीवर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा प्राजक्ता माळीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच सुरेश धस यांनी लोकप्रतिनिधी असताना केलेले हे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत जाहीर माफी मागण्याचे प्राजक्ता माळी म्हणाली आहे. तसेच कोणताही पुरावा नसताना हे गंभीर आरोप केले जात असल्याचे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर बोलणार असल्याचे देखील प्राजक्ता माळी म्हणाली आहे. तसेच एका राजकीय व्यक्तीशिवाय कलाकार करिअर स्वबळावर आणि मेहनत घेऊन बनवू शकत नाही का? असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने उपस्थित केला.
Bigg Boss 18 : ईशा सिंहचं खोटं करणवीर केलं उघड, म्हणाला – मग तो दिवसभर कोणत्या ईशासोबत…
तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली की, “परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का हो, कार्यक्रमाला. त्यांची नावे का येत नाहीत. इव्हेंट मॅनेजमेंटचं सांगायचं तर पुरुष कलाकारांचं नाव घेतात. महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात. पुढे येतात. आणि तुम्ही असं बोलून त्यांचं नाव डागळता. या आधीही प्रथितयश नेत्यांबरोबर फोटो आहेत. मान्यवरांबरोबर फोटो आहेत. त्या फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कुणाही बरोबर नाव जोडणार का? महाराष्ट्रातील राजकारण्यांना ही गोष्ट शोभत नाही” असं स्पष्ट मत प्राजक्ता माळी हिने व्यक्त केले आहे.