Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा बटालियनची शौर्यगाथा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ मधून दिसणार, चित्रपटात दिसणार तगडी स्टारकास्ट

परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 28, 2025 | 11:22 AM
22 Maratha Battalion Goshta Ganimi Kavyaachi Marathi Movie Poster

22 Maratha Battalion Goshta Ganimi Kavyaachi Marathi Movie Poster

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.

Chhaava: ४०० कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून एक पाऊल मागे; १४ व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटालियन’ हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. अद्वितीय साहस, गनिमी काव्याची रणनिती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल, यात शंकाच नाही.

 

दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात,” ‘२२ मराठा बटालियन’ हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनितीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमी कावा हे केवळ एक युद्धतंत्र नव्हते तर ती एक रणनिती होती. शत्रुला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली ती चित्रपट पाहताना अधिकच वाढेल, याची आम्हाला मला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहेत त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढलीय. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”

आनंदाची बातमी! अल्ट्रा झकासवर मराठी ओटीटी मनोरंजनाचा नवा अध्याय

शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि एस आर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबुराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनय बेर्डे, उत्कर्ष शिंदे, यश डिंबळे, सपना माने, टिशा संजय पगारे, अमृता धोंगडे, शिवाली परब, आयुश्री पवार अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 22 maratha battalion marathi movie poster released on social media pravin tarde prasad oak shivali parab play lead role in this marathi film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Movie News
  • prasad oak
  • pushkar jog

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.