
मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने नुकताच १२, ५०० प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला आहे. तेव्हा विक्रमी प्रयोग पूर्ण केल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाटकाचा विनामुल्य प्रयोग ठेवण्यात आला आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा विनामुल्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाआधी प्रशांत दामलेंची विजू माने खास मुलाखत घेणार आहे. दिव्येश बापट या कार्यक्रमाच्या संयोजनाची धुरा सांभाळत असून प्रशांत दामलेंचा १२,५०१ वा प्रयोग हाऊसफुल्ल होणार आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन केले आहे. या नाटकाच्या तिकीट विक्रीला शुक्रवार ४ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून गडकरी रंगायतन येथे नाटकाचे तिकीट प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन आणि पाठिंबा या विशेष नाट्य प्रयोगाला असणार आहे. या कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर हे स्मृतिगंध असून कार्यक्रमाचे संयोजन दिव्येश बापट यांनी केले आहे.