बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत न भूतों न भविष्यती असा अभूतपूर्व असा असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार आहे. महिषासुर षड्रिपूंना जागृत करणार आहे, मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अत्याधुनिक ॲनिमेशनचा वापर करून ही षड्रिपूची दृश्य साकारली जाणार आहेत, महिषासुराच्या मायावी खेळीनुसार मनाच्या सहा शत्रूंपैकी एक ‘माया’ शक्तिशाली रूपात प्रकट होणार आहे.
Iblis Movie Trailer: एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
देव असो अथवा मानव, कुठलाही थेट हल्ला न करता त्याच्या मनाचा ताबा मिळवून सर्वनाश अटळ करणाऱ्या लोभ, क्रोध, मोह, मत्सर, मद व माया या षड्रिपूंच्या प्रभावाने महिषासुर अधिक बलशाली होणार आहे. यामुळे बाल जगदंबेच्या मार्गातील अडथळे अधिकच वाढताना दिसणार आहेत, या प्रकरणात ‘माया’चं आगमन एक धक्कादायक वळण घेऊन येणार आहे. ही ‘माया’ केवळ षड्रिपूंतील एक नसून ती संपूर्ण सृष्टी उध्वस्त करू शकते. त्यामुळे तिच्यापासून निर्माण होणारा धोका मोठा आहे.
बाल जगदंबेच्या लीलांचा सामना करण्यासाठी आता महिषासुर आणि त्याच्या षड्रिपूंच्या रूपाने संकटांचा महापूर उभा ठाकणार आहे. बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकल्यामुळे दैवी शक्ति आणि असुरी शक्तीचा रंगणारा घनघोर सामना ‘आई तुळजाभवानी’च्या दैवी लीलांमुळे आगळावेगळा ठरणार आहे. तेव्हा नक्की पहा, Blockbuster रविवार, 15 जून रोजी, एक तासाचा विशेष भाग, ‘आई तुळजाभवानी’ दु. 1 वा. आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.