mai mavshi and valli
‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही अनेकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी सध्या खूप लोकप्रिय आहेच पण त्याचसोबत या मालिकेतील माई मावशी (Mai Mavshi) आणि वल्ली (पुष्पवल्ली) (Pushpvalli) या व्यक्तिरेखाही अनेकांना आवडतात. ऑन-स्क्रीन या दोघींची भांडणं होत असली तरी ऑफस्क्रीन त्यांची खूप धमाल सुरु असते. त्यांचा एक असाच व्हिडिओ झी मराठीने (Zee Marathi) आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर माई मावशी आणि वल्ली यांचा एक मजेदार व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये अभिज्ञा म्हणजेच वल्ली ही माई मावशींना म्हणते की “अहो मावशी आपल्या समोरच्या चाळीचे मालक कोमात गेले.” त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, “श्रीमंत माणसं कुठेपण जातात.” झी मराठीने ‘मावशी जोमात..बाकी सगळे कोमात!’ असं मजेदार कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान वल्ली आणि मावशी या ऑनस्क्रीन जरी एकमेकांशी वाद घालत असल्या, एकमेकांशी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांचं बॉण्डिंग खूपच चांगलं आहे आहे हे त्यांच्या ऑफस्क्रीन चाललेल्या धमाल मजा मस्ती वरून कळून येतं.