
थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
समोर आलेल्या एका वृत्तानुसार, ट्रान्सजेंडर महिलांचा आरोप आहे की, त्यांच्याकडून सर्व्हिस घेतल्यानंतर भारतीय तरुणाने त्यांना पैसे देण्यास नकार दिला, ज्यामुळे त्याच्यांत वादावादी सुरु झाली आणि महिलांनी थेट व्यक्तीला चोपायला सुरुवात केली. ही संपूर्ण घटना थायलंडच्या पटाया शहरात घडून आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पटाया येथील प्रसिद्ध वॉकिंग स्ट्रीट परिसरातील प्रवेशद्वाराजवळ एका ट्रान्सजेंडर सेक्स वर्करशी त्या व्यक्तीला वाद घालताना पाहिले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “सर्व्हिस मिळाल्यानंतर भारतीय व्यक्तीने पूर्ण पैसे देण्यास नकार दिला ज्यामुळे वादाला सुरुवात झाली. या घटनेत भारतीय व्यक्तीला महिलांच्या संपूर्ण गटाने मिळून हाणल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत व्यक्तीच्या चेहऱ्याला आणि डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. त्याला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले आणि मग पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. थायलंड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
“An Indian thrashed in Thailand.” 🚨 A 52-year-old Indian man, Raj Jasuja, who refused to pay for “services,” was beaten by a group of transwomen in Thailand. As per reports, he has been hospitalized at Pattaya Memorial Hospital for treatment. pic.twitter.com/FIcR6iYdaF — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) January 3, 2026
हा व्हिडिओ @SurajKrBauddh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘थायलंडमध्ये एका भारतीयाला मारहाण, “सेवांसाठी” पैसे देण्यास नकार देणाऱ्या ५२ वर्षीय भारतीय पुरूष राज जसुजा यांना थायलंडमध्ये ट्रान्सवुमनच्या गटाने मारहाण केली. वृत्तानुसार, त्यांना उपचारांसाठी पटाया मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.’ व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “थायलंडचा लेडीबॉय हानिकारक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही घटना २०१६ ची आहे… आता ती शेअर करण्यात काय अर्थ आहे?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “थाई लोकांना पर्यटकांना मारहाण करण्याचे निमित्त देऊ नका, ते सोडणार नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.