Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

या AI ट्रेंडमुळे अनेकदा सेलिब्रिटींची प्रतिमा मलिन करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबाबत असे काही व्हिडिओ प्रसारित झाले असून या जोडप्याने न्यायालयात धाव घेतली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 02, 2025 | 04:25 PM
अभिषेक आणि ऐश्वर्याची कोर्टात धाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिषेक आणि ऐश्वर्याची कोर्टात धाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिषेक-ऐश्वर्या बच्चन न्यायालयात 
  • काय आहे प्रकरण
  • YouTube ला खेचले कोर्टात 
बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन, कधीकधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधीकधी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी, या जोडप्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे त्यांनी त्यांचे वैयक्तिक हक्क मागितले. 

ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी याचिका दाखल केली आहे. AI व्हिडिओ आणि फोटोंच्या वाढत्या वापरामुळे या स्टार जोडप्याने हे पाऊल उचलले. आता, या जोडप्याने पुन्हा एकदा युट्यूबविरुद्ध खटला दाखल करत न्यायालयात धाव घेतली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आता जाणून घ्या. 

ऐश्वर्या आणि अभिषेकची न्यायालयात धाव

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी युट्यूब आणि त्याची मूळ कंपनी, गुगलविरुद्ध ₹४ कोटी (अंदाजे $४५०,०००) भरपाई मागितली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या आदेशानंतर या जोडप्याने अलीकडेच कायदेशीर कारवाई केली आहे. कारण म्हणजे युट्यूबवर त्यांचे बनावट AI -जनरेटेड डीपफेक व्हिडिओ दिसणे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटामागील काय आहे सत्य? प्रल्हाद कक्कर यांनी केला खुलासा

व्हिडिओ त्वरीत काढण्याची मागणी 

६ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत असे व्हिडिओ त्वरित काढून टाकावेत आणि पुन्हा अपलोड होण्यापासून रोखावेत अशी मागणी केली आहे. बच्चन कुटुंबाचे म्हणणे आहे की,  AI चा गैरवापर वाढत आहे आणि म्हणूनच, त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, युट्यूबने त्यांचे व्हिडिओ कोणत्याही एआय मॉडेलच्या प्रशिक्षणात वापरण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलावीत. 

रॉयटर्सने पाहिलेल्या कायदेशीर कागदपत्रांनुसार, हा खटला विशेषतः “घृणास्पद” आणि बनावट AI-व्युत्पन्न व्हिडिओंविरुद्ध आहे. बच्चन कुटुंबाचे म्हणणे आहे की यूट्यूबने त्यांची नावे, आवाज आणि प्रतिमा AI सामग्रीमध्ये गैरवापर होऊ नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.

या चॅनेलवर खटला दाखल करा

या याचिकेत, त्यांनी विशेषतः AI बॉलीवूड इश्क या यूट्यूब चॅनेलचा उल्लेख केला आहे, ज्याचे असे २५९ हून अधिक व्हिडिओ आहेत आणि आतापर्यंत १.६५ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. या व्हायरल व्हिडिओंपैकी एकामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. यामुळे ४ कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आलाय. याआधीदेखील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी न्यायालयात बनवट कंटेट केल्याप्रकरणात दावा केला आहे आणि त्यावरही कोर्टात केस चालू आहे. दरम्यान या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चाही सतत होत असतात आणि ही डोकेदुखी झाल्याचेही अभिषेकने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. 

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

Web Title: Abhishek and aishwarya rai bachchan filed a sue on youtube for fake ai videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Aishwarya Rai Baccchan
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला
1

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक
2

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर
3

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.