(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननंतर आता तिचा पती आणि बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने देखील ओळख, प्रतिमा आणि नावाचा गैरवापर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेल्स आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे त्यांचे नाव, चित्र, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अभिषेक यांनी दाखल केली आहे. अभिनेत्याने न्यायालयाला आवाहन केले आहे की या सर्व गोष्टी त्यांच्या परवानगीशिवाय वापरू नयेत, कारण बरेच लोक त्यांचा वापर वैयक्तिक आणि व्यावसायिक फायद्यांसाठी करत आहेत.
अभिषेक बच्चनने स्वतःचे कारण केले स्पष्ट
याचिकेत अभिषेक बच्चन यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या प्रतिमेचा आणि आवाजाचा गैरवापर केला जात आहे आणि हे सर्व कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय केले जात आहे. आणि यावर ताबोडतोब कारवाई करण्यास अभिनेत्याने सांगितले आहे.
Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा
अभिषेक म्हणाला की, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ आणि कंटेंट समोर आले आहेत, जे पूर्णपणे बनावट आहेत किंवा संपादित आहेत. यातील काही कंटेंटमध्ये त्यांना जाणूनबुजून वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह पद्धतीने सादर केले गेले आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे. या याचिकेद्वारे त्यांनी ‘व्यक्तिमत्व हक्कांचे’ संरक्षण करण्याची मागणी केली आहे. हे अधिकार कोणत्याही व्यक्तीला त्यांचे नाव, चेहरा, आवाज किंवा कोणतीही वैयक्तिक ओळख कशी आणि कोणत्या उद्देशाने वापरावी हे ठरवण्याचा अधिकार देतात.
डीपफेक फोटो बिनधास्त तयार केले जातात
अभिषेकच्या याचिकेत असेही म्हटले आहे की डिजिटल जगात वेगाने वाढत असलेल्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केले जात आहेत, ज्यामुळे केवळ त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही तर ते गोपनीयतेच्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन देखील करत आहेत.
करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
ऐश्वर्याही याआधी उच्च न्यायालयात हजर होती
ऐश्वर्या रायने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘कॉफी, मग आणि इतर वस्तू विकण्यासाठी अवास्तव अंतरंग अभिनेत्रींचे फोटो वापरली गेली आहेत. ज्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोमध्ये छेडछाड केली गेली आहे ते कधीही ऐश्वर्या रायचे नव्हते. हे सर्व एआय जनरेटेड फोटो आहेत.’ असे अभिनेत्रीच्या याचिकेमध्ये लिहिले गेले आहे.