ACP प्रद्युम्न यांची CID मध्ये होणार दणक्यात एन्ट्री, चाहत्यांच्या आग्रहास्तव मेकर्सचा निर्णय
आता CID च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे, शोमधील एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूमुळे नाराज झालेले आणि निर्मात्यांना ट्रोल करणारे ट्रोलर्स आता या बातमीने खूप आनंदी होतील. खरंतर, एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू झालेला नाही, तर त्यांना लवकरच शोमध्ये परत आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते शिवाजी साटम आता लवकरच सीआयडीमध्ये परतण्यास सज्ज झाले आहेत. कारण शोमध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झालेला नसून लवकरच ते मालिकेत पाहायला मिळणार आहे.
प्रतीक बब्बरचा सावत्र भावासोबतचा वाद संपला ? आर्य बब्बरच्या फोटोने वेधले लक्ष…
टेली चक्करने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते एसीपी प्रद्युम्नच्या नाट्यमय पुनरागमनाची योजना आखत आहेत. मालिकेच्या चाहत्यांच्या रागामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. खरंतर, एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हे पात्र आणि शिवाजी साटम गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सीआयडीशी जोडलेले आहेत. ‘दया दरवाजा तोड़ दो’ आणि ‘कुछ तो गडबड है दया’ हे त्यांचे डायलॉग्ज नेहमीच चाहत्यांच्या तोंडावरील आहेत.
अशा परिस्थितीत, जेव्हा निर्मात्यांनी एसीपी प्रद्युम्न यांच्या हत्येचा ट्रॅक दाखवला तेव्हा चाहत्यांनी निर्मात्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या निधनाने अनेक चाहते भावुक झाले. पण आता चाहत्यांच्या मागणीनुसार, मालिकेत शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युमन यांच्या पुनरागमनासाठी एका खास सीनचा विचार केला जात आहे. शिवाजी साटम यांना त्यांच्या पात्राच्या मृत्यूबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, निर्मात्यांनी त्यांना याबद्दल काहीही सांगितले नव्हते.
आता होणार फुल टू राडा; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित…
दरम्यान, नुकतेच सीआयडीमध्ये दाखल झालेल्या पार्थ समथानने अलीकडेच सांगितले की, त्याने या मालिकेची ऑफर आधी नाकारली होती कारण तो घाबरला होता. त्याने असेही म्हटले की, त्याचे पात्र मालिकेत अनेक ट्विस्ट आणेल आणि एसीपी प्रद्युमनच्या मृत्यूची चौकशी देखील करेल. अभिनेता शिवाजी साटम यांच्याव्यतिरिक्त सीआयडीमध्ये दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, हृषिकेश पांडे आणि अजय नागरथ हे कलाकार आहेत.
सोनी टीव्ही व्यतिरिक्त CID शो दर शनिवार-रविवारी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात आहे.