
look back 2024 remembering the bollywood and tv stars we lost in 2024
मराठी फिल्म इंडस्ट्रीतून दुखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. त्यांचे निधन वयाच्या ५७ व्या वर्षी झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची कर्करोगासोबत असलेली झुंज अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा ते आजारी पडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराअंती त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते कर्करोगातून बरे देखील झाले होते. ते बरे झाले असताना त्यांचा सत्कार वैगेरेही करण्यात आला होता. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही करण्यात आले होते.
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार म्हणून अतुल परचुरे यांची इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळखही होती. त्यांनी अनेक मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ‘अळी मिळी गुपचिळी’, ‘वादळवाट’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’ सारख्या अनेक टेलिव्हिजन सीरियल्समध्ये त्यांनी काम केलं आहे. उत्तम अभिनेता आणि माणूस म्हणून ओळख त्यांची इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख आहे. त्यांच्या निधनाने मराठी फिल्म इंडस्ट्रीवर दुखाचा डोंगर कोसळला असून चाहत्यांकडून सोशल मीडियावर अतुल यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अतुल परचुरे यांच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले की, “अतुलच्या निधनाचे वृत्त ऐकून माझ्याकडे शब्दच उरले नाहीत. मी शब्दात माझी प्रतिक्रियाच मांडू शकत नाही. त्याचं “सुर्याची पिल्ले” हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. तो त्या नाटकाची रियसल सुद्धा करत होता. पाच दिवसांपूर्वी त्याची अचानक तब्येत बिघडल्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. आम्हाला वाटलं नव्हतं की तो इतक्या लवकर आपल्याला सोडून जाईल. तो परत आल्यानंतर आम्ही नाटकाची जोरदार सीरियल करणार होतो. इतका सुंदर अभिनेता आपल्याला सोडून गेला, माझ्याकडे आता काही शब्दच नाही आहेत. आम्ही दोघंही नऊवीत असल्यापासून एकत्र काम करत आहोत. आमच्या दोघांचंही पहिलं नाटक होतं, “टिळक आणि आगरकर”… उत्तम अभिनेता आणि माणूस आपल्याला सोडून गेला याचं कायमच दुख आहे.” प्रतिक्रिया देत असताना अभिनेते जयवंत वाडकर भावूक झाले होते.
अतुल परचुरे यांच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, “अतुलच्या निधनाचे वृत्त ऐकून मला फार दुख झाले आहे. त्याच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एक उत्तम अभिनेता आज मराठी इंडस्ट्रीने गमावला आहे. त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या अभिनयाची प्रतिमा तयार केली होती. त्याने स्वत:चे नाव तयार केलं होतं. फार लवकर त्याने एक्झिट घेतली, त्याचं जाणं मनाला दुख गेलंय. मी नि:शब्द झालोय. माझा अत्यंत जवळचा तो मित्र होता. माझा आवडता ही तो मित्र होता.”
अतुल परचुरे गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा त्यांनी मराठी रंगभूमीवर एन्ट्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी ‘सुर्याची पिल्ले’ या नाटकाची निवडही केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला आहे.