Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalit Prabhakar: साधा पण आकर्षक अंदाज! ताज हॉटेलमध्ये ललित प्रभाकरचा स्टायलिश लूक पाहून चाहते फिदा

मराठी मनोरंजनविश्वातील चॉकलेट बॉय अभिनेता ललित प्रभाकर आपल्या स्टायलिश अंदाजाने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते त्याच्या खास फोटोशूटमुळे! ललितने नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये फोटोशूट केले असून, त्यातील त्याचा रुबाबदार लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, ‘प्रहार’ चित्रपटात अजमल कसाबची गंभीर भूमिका साकारल्यानंतर त्याचं हे फोटोशूट विशेष लक्ष वेधून घेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 12:37 PM

पांढऱ्या कुर्त्यातील ललित प्रभाकरचा क्लासी लूक (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

या फोटोशूटसाठी ललितने खास स्टायलिंग केलं असून, त्याच्या लूकमध्ये एक वेगळाच रुबाब पाहायला मिळत आहे. ‘ताज इज अॅन इमोशन’ असं कॅप्शन देत त्याने या ऐतिहासिक वास्तूबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

2 / 5

ललित प्रभाकर नुकताच ‘प्रहार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात त्याने अजमल कसाबची भूमिका साकारली होती. या गंभीर आणि आव्हानात्मक भूमिकेमुळे ललितची विशेष चर्चा झाली होती. अशा गंभीर भूमिकेनंतर आता ताज हॉटेलमधील त्याचे स्टायलिश फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

3 / 5

एका फोटोत तो आलिशान सोफ्यावर आरामात बसून पोझ देताना दिसतो, तर दुसऱ्या फोटोत कॅमेऱ्याकडे पाहत त्याने खास अंदाजात फोटो काढले आहेत. या फोटोंना त्याने ‘ताज इज अॅन इमोशन’ असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमधून त्याने या ऐतिहासिक वास्तूबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

4 / 5

या फोटोशूटसाठी ललितने एकदम साधा लूक निवडला आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला असून, पायात काळ्या रंगाच्या चप्पल आणि हातात आकर्षक घड्याळ घातले आहे. साध्या पेहरावातही त्याचा वेगळाच रुबाब पाहायला मिळत आहे.

5 / 5

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या ललितने मराठी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अनन्या’, ‘झोंबिवली’, ‘मीडियम स्पायसी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपणाऱ्या ललितच्या अभिनयाचे चाहते कौतुक करत असतात. आता त्याच्या ताज हॉटेलमधील या क्लासी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Web Title: Lalit prabhakar taj hotel photoshoot white kurta look viral photos ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor

संबंधित बातम्या

Ram Charan-Sukumar RC17: ‘रंगस्थलम’नंतर राम चरण-सुकुमार पुन्हा एकत्र येणार; नव्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा
1

Ram Charan-Sukumar RC17: ‘रंगस्थलम’नंतर राम चरण-सुकुमार पुन्हा एकत्र येणार; नव्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप
2

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री
3

Aishwarya Rai Birthday: सुष्मिता सेनकडून हरली, डेब्यूपूर्वीच नाकारला सुपरहिट सिनेमा; आज आहे दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
4

Janhvi Kapoor: आई श्रीदेवींच्या गाजलेल्या ‘नागिन’ लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर; हॅलोविन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.