Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“निळुभाऊंच्या नावाच्या पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही…” निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट

येत्या रविवारी अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सोहळ्यात अभिनेते किरण माने यांचा ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त किरण यांनी पोस्ट शेअर केली

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 25, 2024 | 08:44 PM
“निळुभाऊंच्या नावाच्या पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही...” निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट

“निळुभाऊंच्या नावाच्या पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही...” निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस मराठी ४’ अभिनेता किरण मानेंनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेले किरण माने सध्या कमालीचे चर्चेत आले आहेत. ते एक प्रसिद्ध अभिनेता असून ते राजकारणातही सक्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री मारली आहे. नेहमीच आपल्या अभिनयातून चर्चेत राहणारे किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही तासांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…”, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट

येत्या २९ डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात अभिनेते किरण माने यांचा ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

नाताळनिमित्त अभिनेत्री कीर्ती शेट्टीचं खास फोटोशूट

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात,

“हॅलो किरण माने सर… संदीप ससाणे बोलतोय. ‘अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त यावर्षीपासून ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ सुरू करतोय… पहिलाच पुरस्कार तुम्हाला द्यायचा यावर आमच्या निवड समितीचं एका क्षणात एकमत झालं. तुमच्या होकाराची अपेक्षा आहे.” काय उत्तर द्यावं सुचेनाच. आनंदानं मन भरून आलं. डोळे पाणावले. ‘अण्णाभाऊ-निळूभाऊ’ म्हणजे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला समृद्ध करणारे माझे आदर्श ! निळूभाऊंना तर मायणीच्या तंबूत पाहिलेल्या ‘पिंजरा’ पासून परिवर्तनाच्या चळवळीतल्या भाषणांपर्यंत मी वेड्यासारखं ‘फॉलो’ केलं… नंतरच्या काळात मला अल्पकाळ का होईना सहवास लाभला. चक्क सातारच्या माझ्या घरीही ते आले ! निळुभाऊंच्या नावानं पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही… कळाल्यापासनं हवेत तरंगतोय… आजपर्यंत ज्या-ज्या अवॉर्डमधनं कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शुन्य करून टाकणारा हा बहुमान आहे ! मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नांव आहे, त्या नावानं असलेला पुरस्कार हा मी तेवढ्याच रूबाबात आणि टेचात स्विकारणार. …कारण माझा संघर्ष मला सांगतोय… अभिनयासाठी मी खाल्लेल्या खस्ता मला सांगतायत… शिवशाहुफुलेआंबेडकरी विचारांचा प्रसार करतो म्हणून इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ मला सांगतेय… त्यावेळचे माझ्या आईवडीलांच्या डोळ्यांतले अश्रू मला सांगतायत… की हो, मी हा पुरस्कार डिझर्व करतो ! निळूभाऊ, तुमच्यासमोर मी कायम नतमस्तक आहे, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत राहीन… तुम्ही आणीबाणीच्या काळात नागपूरच्या चौकात निडरपणे केलेलं भाषण असो… परिवर्तनाच्या चळवळीत केलेली व्याख्यानं असो… तथाकथित धर्मांध संस्कृतीरक्षकांना झुगारून केलेले ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग असोत… ‘कोण म्हणतं टक्का दिला’ सारखं दलित चळवळीच्या विचारांचं नाटक प्रोड्यूस करणं असो… ‘अभिनेत्याला समाजभान नसेल आणि भवताली घडणार्‍या अराजकावर बोलण्याचा निडरपणा नसेल, तर त्याची कला पोकळ आणि क्षुद्र ठरते’, हे तुम्ही मला शिकवलंय आणि मी ते शंभर टक्के अंगीकारलंय ! सलाम निळुभाऊ.”

“रंग माळीयेला…” कौमुदी वालोकरच्या हळदीतले पाहा सुंदर Photos!

Web Title: Actor kiran mane post after announcing the first award in the name of nilu phule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 08:44 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • marathi actor
  • nilu phule

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.