Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार क्रेझ…

वऱ्हाडी भाषेतील "झामल झामल" हे व-हाडी भाषेतील गाणं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. आणि विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध होताचं सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुद्धा गेलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 09, 2025 | 07:00 PM
वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार क्रेझ...

वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार क्रेझ...

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो. असचं एक वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” हे व-हाडी भाषेतील गाणं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. आणि विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध होताचं सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुद्धा गेलं आहे. यावरून असे दिसते की आपल्या माय मराठी भाषेतील बोली भाषांना आजही लोक आवडीने त्या भाषेत संवाद साधतात तसेच अमराठी लोकांनाही या भाषा आवडतात.

थोडक्यात बचावली प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीच्या हातावर सांडलं तेल…

झामल झामल गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी बोकन आणि अभिनेता विश्वास पाटिल यांची नवीन जोडी पाहायला मिळेल. अक्षय शिवाजी भाकरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिलं आहे.तर गाण्याचे बोल प्रशांत तिडके यांचे आहेत. गायिका सानिका अभंग हिने हे गाणं गायलं असून या गाण्यातील रॅपचा भाग रॅपर ओंकार दासगुडे यांनी गायला आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर विकी वाघ हे आहेत. या गाण्याची निर्मिती सौरभ मास्तोळी यांनी केली आहे.

कान्सनंतर नशीबच पालटलं… अभिनेत्री छाया कदम यांना बड्या ज्वेलरी ब्रँडची खास ऑफर

अभिनेता विश्वास पाटिल या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, “मी मुळचा मराठवाड्यातला आहे. आणि हे गाणं विदर्भातील व-हाडी प्रांतातील आहे. मी जेव्हा पहिल्यांदा भाषा ऐकली तेव्हा ही भाषा मला खूप साजूक वाटली. आणि मी लगेच गाण्यासाठी होकार दिला. गाण्याची संपूर्ण टीम फार मेहनती होती. त्यामुळे गाणं शूट करताना खूप मजा आली. टीमचे आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”

अभिनेत्री राजेश्वरी बोकन या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “गाण्याची प्रोसेस खूप कमाल होती. परंतु गाण्याच्या शुटींगच्याच दिवशी मी आजारी पडले होते. कोरीओग्राफर विकी दादा पण बोलत होता की तू आता कसं शूट करणार आणि हे गाणं डान्सीकल आहे, या गाण्यात एनर्जीवाले स्टेप्स होते. परंतु काय माहित माझ्यात कुठून एनर्जी आली मी ते संपूर्ण गाणं शूट केलं. आणि आता या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून आनंद होत आहे.”

या गाण्याचे निर्माते आणि संगीतकार सौरभ मास्तोळी या गाण्याविषयी सांगतात,”गीतकार प्रशांत तिडके माझे मित्र आहेत ते मला म्हणाले की आमच्या विदर्भाच्या भाषेत एकही गाणं अजून आलेलं नाही. तेव्हा आमचं ठरलं की विदर्भाच्या भाषेत व-हाडी गाणं करूया. “झामल झामल” या शब्दाचा अर्थ आहे टंगळ मंगळ करणे किंवा टाईमपास करणे. तर विदर्भातील व-हाडी भाषेतील हे रोमॅंटीक गाणं आहे. गाण्यात एक कपल दाखवलं आहे. ज्यात त्या मुलीचं मुलावर प्रेम असतं आणि त्या मुलाचं ही मुलीवर प्रेम असतं. फक्त तो थोडासा इंट्रोवर्ट असतो. या गाण्याद्वारे ती मुलगी त्याला प्रेमाने विचारत असते की चल आता भाव खाऊ नकोस हो म्हणं. या गाण्यातून त्यांची प्रेमाने केलेली नोकझोक आणि व-हाडी भाषेचा तडका अगदी उत्तम झाला आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता त्यांना हे व-हाडी गाणं आवडलं आहे. ही आमच्या कामाची पोचपावती आहे.”

“कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?” अभिनेत्याचा भोपाळच्या मंदिरातला ‘तो’ व्हिडीओ बघून चाहते हैराण

गायिका सानिका अभंग या गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यानचा अनुभव सांगते, “हे माझं पहिलंच व-हाडी गाणं आहे. जेव्हा आम्ही या गाण्याची रेकॉर्डींग करत होतो. तेव्हा प्रत्येकाचे पाय या गाण्यावर थिरकत होते. आणि हे गाणं रेकॉर्ड करताना आम्ही खूप धम्माल केली.”

मधुर संगीत, हृदयस्पर्शी कथा, व-हाडी बोली भाषा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून झामल झामल हे गाणं सर्व प्रेमीयुगूलांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक भेट ठरणार आहे. प्रेमाच्या दुनियेत हरवण्यासाठी तयार व्हा!

Web Title: Actor vishwas patil and actress rajeshwari bokans first song zhamal zhamal in the varhadi language song released and trending on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • viral Song

संबंधित बातम्या

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
1

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना
2

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
4

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.