Kapil Sharma Seeks Blessings At Bhojpur Shiv Mandir In Bhopal
लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मुळे घराघरात प्रसिद्ध झालेला कपिल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कॉमेडियन कपिल शर्माचा सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याचं दिलेल्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. व्हिडिओमध्ये अभिनेत्याचा लूक ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. अभिनेत्याचे वजन कमी झाले असून अभिनेता प्रचंड बारीक झालेला दिसत आहे. अभिनेत्याचा लूक पाहून नेटकरी सध्या त्याचं कौतुक करीत आहेत.
सलमान खानचा Sikandar रिमेक की ओरिजनल ? दिग्दर्शक ए.आर. मुरुगदासने जरा स्पष्टच सांगितलं…
कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता भोपाळच्या भोजपूर शिव मंदिरात पाया पडण्यासाठी जाताना दिसत आहे. मंदिरामध्ये पाया पडायला जातानाचा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, “भोपाळच्या भोजपूर शिवमंदिरातून खास तुमच्यासाठी आशिर्वाद पाठवत आहे. ११ व्या शतकात राजा भोज यांनी बांधलेल्या वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. जर तुम्ही भोपाळमध्ये असाल तर नक्की भेट द्या, हर हर महादेव…” अभिनेत्याची ही इन्स्टाग्राम पोस्ट पाहून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
महेश मांजरेकर यांच्या नाटकातून ‘फिल्टर कॉफी’ दरवळणार, मराठी रंगभूमीवर दिसणार दमदार कलाकारांची फळी
कपिल शर्माचा हा व्हिडीओ पाहून लोकांचं सर्व लक्ष कपिलच्या तब्येतीकडे गेलं आहे. व्हिडिओमध्ये कपिलची तब्येत प्रचंड बारीक झालेली दिसतेय. त्याचा लूक पाहून चाहत्यांनी त्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. कपिल त्याच्या आगामी ‘किस किस को प्यार करु’ या चित्रपटाच्या सीक्वलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या प्रकल्पाचे चित्रीकरण या वर्षी जानेवारीमध्ये सुरू झाले आणि त्याचे दिग्दर्शन अनुकल्पा गोस्वामी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास-मस्तान करत आहेत. या चित्रपटामुळे कपिलने हे वजन घटवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अचानक कपिल कसा बारीक झालाय? तो आजारी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हे प्रश्न पडण्यापेक्षा सर्वांनीच सेलिब्रिटींप्रमाणे स्वतःची तब्येत आणि आरोग्य नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलं.