(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली ती म्हणजे छाया कदम. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री छाया कदम यांनी तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्स सोबत बॉलिवुड गाजवल आणि आज महिला दिनाच्या दिवशी त्या एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडचा महत्त्वपूर्ण चेहरा बनल्या आहेत. तसेच या बायमुने त्यांच्या चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे. तसेच त्या कोणत्या बड्या ज्वेलरी ब्रँड साठी खास चेहरा बनल्या आहेत हे जाणून घेऊयात.
खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ना देखणी, मॉर्डन असलेली अभिनेत्री लागते पण हाच विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँडचा महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत. ज्वेलरी ब्रँड म्हटलं की सगळ्यांना डोळ्या समोर एखादी मोठी अभिनेत्री किंवा मॉडेल दिसते पण यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम या त्यांच्या अभिनयाचं सोनेरी रूपाने या ब्रँड चा खास चेहरा झाल्या आहेत.
छाया कदम हे नाव साता समुद्रापार पोहचलं खर पण भारतात देखील आज हे नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जाते आहे. त्यांच्या अभिनयाचं वेगळेपणं सगळ्यांना आपसूक मोहून जात आहे. छाया ताईंनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या आणि त्यांनी बॉलिवुड च्या सोबतीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख संपादन केली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम हा चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि एका बड्या ज्वेलरी ब्रँड चा महत्त्वपूर्ण भाग त्या झाल्या आहेत.
“कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?” अभिनेत्याचा भोपाळच्या मंदिरातला ‘तो’ व्हिडीओ बघून चाहते हैराण
‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘झुंड’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये छाप पाडणाऱ्या छाया कदम नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवत आहेत. अभिनेत्रीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकताच त्यांच्या एक खास वेब सिरीजसाठी त्यांना कान्समध्ये पुरस्कार देखील मिळाला. अभिनेत्री तेव्हापासून चर्चेत आहे. आणि चाहत्यांच्या पसंतीस येत आहे.