(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पिंक पॉवर रन 2025 मध्ये अनेक नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता दारासिंग खुराना यांनी केले. मिस वर्ल्ड 2025 देखील या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. टेनिसमधील दिग्गज आणि ऑलिंपिक पदक विजेते लिअँडर पेस तसेच हैदराबादच्या प्रसिद्ध समाजसेविका आणि व्यावसायिका सुधा रेड्डी यांनीही यात भाग घेतला.
यावर्षीची थीम “Stride and Shine” होती. या थीममध्ये फिटनेस, उत्सव आणि आरोग्याचा संदेश यांचा संगम दिसून आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी यात भाग घेतला आणि स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासोबत वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.
कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी
2017 मध्ये मिस्टर इंटरनॅशनल इंडिया हा किताब जिंकलेले दारासिंग खुराना आज अभिनेता आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात. ते आरोग्य आणि युवकांशी संबंधित मोहिमांमध्ये सतत कार्यरत आहेत. डाटरी (भारताची ब्लड स्टेम सेल डोनर रजिस्ट्र्री) चे राजदूत म्हणून त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम केले आहे आणि लोकांना डोनर होण्यासाठी प्रेरित केले आहे. पिंक पॉवर रनचे सूत्रसंचालन करताना त्यांनी स्तन कर्करोगाबद्दलही जनजागृती केली. त्यांचे म्हणणे आहे की लवकर निदान झाले तर उपचारांची शक्यता अनेक पटींनी वाढते.
Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी
लिअँडर पेस म्हणाले:
“एवढे लोक एका अशा हेतूसाठी एकत्र आले आहेत, जो फक्त फिटनेसपुरता मर्यादित नाही, हे पाहणे खूप प्रेरणादायी आहे. पिंक पॉवर रन म्हणजे ताकद, एकता आणि जिद्दीचे प्रतीक आहे.”
स्तनाचा कर्करोग हा भारतात महिलांच्या मृत्यूचे एक मोठे कारण आहे. तज्ञ सांगतात की वेळेवर तपासणी झाल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता खूप वाढते. पिंक पॉवर रनने प्रसिद्ध व्यक्ती, नेते आणि सामान्य नागरिकांना एकत्र आणून हा संदेश अधिक ठळक केला.
दारासिंग खुराना म्हणाले,
“आज आपण फक्त फिटनेससाठी धावत नाही, तर जागरूकतेसाठी, ताकदीसाठी आणि प्रत्येक त्या स्त्रीसाठी धावत आहोत जी एका निरोगी उद्याची हक्कदार आहे.”
पिंक पॉवर रन 2025 ने हे दाखवून दिले की जेव्हा लोक एखाद्या चांगल्या उद्दिष्टासाठी एकत्र येतात तेव्हा ते खरोखर मोठा बदल घडवून आणू शकतात.