Star Pravah Marathi Serial TRP : सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची एन्ट्री झाली आहे. मराठी मालिका विश्वातील अशा अनेक मालिका आहेत ज्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचं समोर आलं आहे. TRPच्या शर्यतीत काही मालिकांनी अव्वल स्थान मिळवलं असून ही यादी आता समोर आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवलेलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे. कोणत्या आहेत या मालिका चला तर मग जाणून घेऊयात.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी TRP च्या रेषेत सर्वात बाजी मारली आहे. नव्याने सुरु झालेल्या मालिकांना प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत मराठी TRP तडका या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. टॉप 15 मालिकांची यादी जाहीर झाली असून नव्याने सुरु झालेली लपंडाव मालिका 12 व्या स्थानावर आहे. तर साधी माणसं, आता होऊदे धिंगाणा या मालिका टॉप 10 मध्ये असल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी नशीबवान मालिका सुरु होऊन काही दिवस झाले तरी ही मालिका टॉप 6 मध्ये असून अवघ्य़ा काही दिवसांतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
स्टार प्रवाहच्य़ा मालिकेच्य़ा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मालिका म्हणजे ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. दरवेळेच्या जास्त करुन TRP च्या शर्यतीत पहिल्या स्थानावर ठरलं तर मग मालिकेने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अव्वल स्थानी आहे.सहाव्या स्थानावर नशीबवान, सातव्या स्थानावर लक्ष्मीच्या पाऊलांनी, आठव्या स्थानावर येड लागलं प्रेमाचं, नवव्या स्थानावर आता होऊ दे धिंगाणा, दहाव्या स्थानावर साधी माणसं, अकराव्या स्थानावर मुरांबा, बाराव्या स्थानावर लपंडाव, तेराव्या स्थानावर अबोली, चौदाव्या स्थानावर शुभविवाह, तर सगळ्यात शेवटी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आहे.