Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘टिपिकल मुलगी साकारणं जास्त आव्हानात्मक’ अभिनेत्री पूर्वा कौशिकच्या ‘दीपज्योती’ मधील वेगळ्या प्रवासाला सुरूवात

पूर्वा कौशिकने याआधी साकारलेली ‘शिवा’ प्रेक्षकांना खूपच भावली आणि आता पुन्हा नव्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्योतीलादेखील असंच प्रेक्षक स्वीकारतील अशी तिची अपेक्षा आहे, खास मुलाखत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 04:59 PM
अभिनेत्री पूर्वा कौशिकसह खास बातचीत

अभिनेत्री पूर्वा कौशिकसह खास बातचीत

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवर अनेक वेगवेगळ्या मालिका येत असतात आणि त्यातील पात्रांचा पगडा प्रेक्षकांवर असतो हे मात्र नक्की. आजपासून ‘दीपज्योती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यामधून अभिनेत्री पूर्वा कौशिक पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीसाठी सज्ज आहे. मात्र ‘शिवा’ या भूमिकेतून दिसलेली पूर्वा अगदी विरोधाभास असणाऱ्या भूमिकेत दिसणार आहे. 

या मालिकेचा प्रोमो आल्यापासूनच तिच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली होती आणि ही भूमिका अगदीच वेगळी असल्याचं खुद्द पूर्वानेही सांगितलं आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली आणि या नव्या भूमिकेविषयी पूर्वाला नक्की काय वाटत आहे? तिने या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबाबत अगदी दिलखुलासपणे ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारल्या आहेत. 

पुन्हा एकदा त्याच चॅनेलबरोबर काम करताना पण वेगळ्या भूमिकेत कसं वाटतंय?

असं विचारल्यावर पूर्वा म्हणाली, ‘दीपज्योतीमधील ज्योती ही खूप साधीभोळी आणि अगदी टिपिकल मुलगी आहे. पहिला मुद्दा हाच होता की, प्रेक्षक स्वीकारतील का? शिवा ही मालिका खूप चालली आणि प्रेक्षकांनी मला त्याच स्वरूपात स्वीकारलं. खरं सांगायचं तर पूर्वा म्हणूनही मी अगदी ज्योती या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला खूपच मजा येत आहे.’

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिकचा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

या भूमिकेसाठी काही तयारी करावी लागली का?

यावर पूर्वाने अगदी मनमोकळेपणाने सांगितलं की, ‘हो, कारण शिवा करताना मला बिनधास्त काम करता येत होतं कारण ती भूमिका अगदी माझ्या स्वतःच्या स्वभावाशी थोडीफार निगडीत होती. पण ज्योती करताना मला सगळ्याच गोष्टीचे भान ठेवावे लागत आहे. कारण गेले १२–१३ वर्ष मी करतेय आणि नाटक करताना तारसप्तकातला स्वर लावावा लागतो. इतकंच नाही तर माझा स्वतःचा बोलताना स्वरही जरा मोठाच आहे. पण अगदी साधेपणाने बोलणारी ज्योती साकारणं हे माझ्यासाठी आव्हान होतं. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे. ती रोज कानातले, पैंजण हे सर्वच दागिने घालते आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी काहीच करत नाही. त्यामुळे त्या भूमिकेत जगताना मला जरा आव्हानच आहे. तिच्यासारखं अगदी साधेपणाने बोलणं जरा कठीण जातंय पण मजा येत आहे.’

ही भूमिका स्वीकारताना नक्की काय विचार केलास?

यावर पूर्वाने अगदी गंभीरपणे उत्तर देत म्हटलं की, ‘‘शिवा’ नावाची भूमिका सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का? तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का? पण कामाला सुरूवात केल्यानंतर आणि झी मराठीने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानंतर मला खात्री झाली की, प्रेक्षक मला नक्की स्वीकारतील आणि म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली. काहीतरी वेगळं करण्याची माझी इच्छा होती. कारण शिवानंतर त्याच धाटणीच्या भूमिका मला येत होत्या. अगदी यासाठी मी एक नाटकातील भूमिकाही नाकारली होती आणि त्यानंतर ही भूमिका वाट्याला आली, त्यामुळे खूप मस्त वाटतंय.’

ज्योती या भूमिकेसाठी काय अभ्यास केला आहेस?

यावर पटकन पूर्वाने सांगितले की, ‘ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खरंच खूप मेहनत घ्यावी लागत आहे. ज्योतीचं बोलणं, वागणं, तिचे हावभाव, तिचं बघणं, राग व्यक्त करण्याची पद्धत, तिचा अबोला आणि तिचा साधेपणा हे सगळं खूप सूक्ष्म आहे. या सगळ्याची तयारी करणं माझ्यासाठी सध्या तारेवरची कसरत आहे.’

प्रसाद जवादेबरोबर आणि टीमबरोबर कसा बाँड निर्माण झाला?

‘त्यासाठी मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत’, असं अगदी सहजपणाने पूर्वा म्हणाली, ‘प्रसादला मी आधीपासून ओळखत होते. पण काम करायला लागल्यावर पटकन बाँड झाला आणि माझ्याबरोबर काम करणारे सहकलाकार खूप मस्त आहेत, त्यामुळे अशी टीम मिळाल्याने कामही खूप मस्त होतंय’

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग

शिवामध्ये बुलेट शिकली होतीस आणि यात रिक्षा चालवत आहेस तर काही प्रशिक्षण घेतलंस का?

यावर उत्साहाने आणि अगदी आपल्यालाही आश्चर्य वाटेल असा अनुभव पूर्वाने सांगितला, ‘जेव्हा रिक्षा चालवायचा सीन करायला सुरूवात केली मला मार्गदर्शन मिळालं आणि मी त्वरीत तसंच केलं. मी कोणतंच प्रशिक्षण घेतलं नाही आणि त्यामुळे मलाही या गोष्टीचं कौतुक आणि आश्चर्य आहे की, आपण कसं काय हे केलं? याशिवाय दिग्दर्शकांकडूनही माझं कौतुक झाल्याने तर मी अगदीच आनंदी आहे. पण इतकं कळलंय की आपल्याला गोष्टी पटकन जमतात’

याशिवाय जाताना पूर्वा म्हणाली की, ‘ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. जसं प्रेम शिवाला दिलं तसंच दीपज्योतीमधील ज्योतीलाही मिळेल अशी नक्कीच अपेक्षा आहे”

Web Title: Actress purva kaushik shared her exclusive experience staring new marathi serial deepjyoti on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • marathi serial update
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ? ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की, तो काळ….
1

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ? ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की, तो काळ….

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग
2

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!
3

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!

सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव? ‘हुकुमाची राणी’ महत्त्वपूर्णावर वळणावर
4

सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव? ‘हुकुमाची राणी’ महत्त्वपूर्णावर वळणावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.