रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीने दिल्या खास पद्धतीत शुभेच्छा; म्हणाला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा...'
‘नांदा सौख्य भरे’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेमुळे महाराष्ट्रातल्या घराघरांत टेलिव्हिजन अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रसिद्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे आणि अशातच अभिनेत्रीचा आज वाढदिवस देखील आहे. रेश्मा २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाला इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर अभिनेत्री आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या पती अर्थात पवनने खास पोस्ट शेअर केली आहे.
कश्मिरा शाहला पती कृष्णा अभिषेकने दिले खास सरप्राईज, म्हणाली…
रेश्माच्या पतीचं नाव पवन असून तो कलाविश्वापासून दूर आहे.. तिने पतीचं नाव आणि त्याचा चेहरा हळदी समारंभाच्या दिवशी चाहत्यांसमोर आणला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतरच रेश्माचा वाढदिवस आहे. रेश्माच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीने खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून दिल्या आहेत. मंदिरात दर्शन घेतानाचा फोटो पवनने शेअर केला आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ಹೆಂಡತಿ. देवाचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठिशी राहूदे. प्रेम, आनंद, उत्तम आरोग्यासह तुझ्या आयुष्यात कायम भरभराट येऊदे.” असं कॅप्शन पवनने रेश्मासाठी लिहिली आहे.
रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीने दिल्या खास पद्धतीत शुभेच्छा; म्हणाला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा…’
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, पवनने लिहिलेला कन्नड शब्द सर्वांचं लक्ष वेधून घेतला आहे. पवनने लिहिलेल्या ह्या ‘ಹೆಂಡತಿ’कन्नड शब्दाचा अर्थ पत्नी किंवा बायको असा होता. रेश्मा आणि पवनचा विवाहसोहळा आधी पारंपरिक मराठी पद्धतीने आणि त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने पार पडल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. रेश्मा शिंदेचं हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्रीने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर रेश्माने पूर्णवेळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची ‘इलू इलू’गोष्ट रुपेरी पडद्यावर उलगडणार…