
(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)
घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. तिने स्वराज्यरक्षक संभाजी, अस्मिता, आई कुठे काय करते, अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. ती सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहे. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करताना आपल्या दिसते. ती नेहमी तिच्या वैयक्तिक, कामाबद्दल व्यक्त होत असते. तसेत ती तिचे अनुभव देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने दोन तीन दिवसांत आलेल्या अनुभवांबद्दल तिने लिहिले आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी तिला सिंदखेड राजा येथे पोहोचायचे होते. यावेळी तिला काय अडचणी आणि आणि कसा मार्ग निघाला याबद्दल तिने लिहिले.
अश्विनी महागंडेचे पोस्ट,
”आजच्या महानाट्याच्या प्रयोगाला काल दुपारी ४ वाजल्यापासून ते आज ११ वाजेपर्यंत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र असा प्रवास करून पोहोचले आजच्या महानाट्याच्या प्रयोगाला. सिंदखेड राजा इथे मी कधीच आले नाही पण येण्याची मनापासून इच्छा होती. जिजाऊंसाहेबांच्या स्मृतिदिना निमित्त आज महानाट्य गडगर्जना सादर होत आहे .
काल विमान कॅन्सल झालं. थोड्या वेळेसाठी मला काहीच सुचत नव्हतं. दुसरं विमान, रेल्वे किंवा अजून काहीतरी. प्रयत्न सुरू होते. इतरांनाही समजत नव्हतं की आता काय करायला हवं.”
पुढे तिने लिहिलं, थोड्या वेळासाठी श्री काळजीने नकोच असे बोलून तिचे डोळे पाणवले. कारण १२०० km चा प्रवास आहे. अगदीच थोडा नाही. पण मला प्रयोग करायचा आहे. मला जायचे आहे.
आम्ही जिथे जेवायला थांबलो होतो त्या होटल च्या मालकाना श्री ने जावून विचारले , अडचण सांगितली . शुभम भैयांनी बादल भैया ला बोलवून घेतले. त्यांनीच सगळे मॅनेज केले. २ उत्तम माणसं सारथ्य करतील तेही दिवस रात्र तर योग्य स्थळी मी पोहोचणारच या विचाराने माझा प्रवास सुरू झाला. हा प्रवास अद्भुत आहे कारण मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे आणि त्यांनंतर तर विश्वास बसला की देव आहे. काय पाहिजे ते फक्त मागा.. ”
”श्री, अथर्व आणि मला हाच प्रश्न होता की हे का घडतेय. आम्ही एका उत्तम कारणासाठी भेटलो आणि ते पूर्ण करून आमचे आमचे प्रवास सुरू झाले. ”
”आजचा महानाट्याचा प्रयोग हा मला करायचाच होता कारण ही माझ्याकडून जिजाऊसाहेबांना मानवंदना असेल. पण कामाप्रती माझा शब्द मी पाळला”
Bigg Boss Marathi 6: घर गाजवायला येतेय ‘ही’ सौंदर्याची फूलनदेवी! हातावरचा टॅटू दिसला अन् चाहत्यांना कळलं बिग बॉस स्पर्धकाचं नाव
अभिनेत्रीने असंही लिहिले, ”आभार मानून मोकळे होणे माझ्या स्वभावात नाही.अशा माणसांचे ऋण आपण फेडू शकत नाही,” असं म्हणत अश्विनीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.