Adah Sharma Photos
‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचा आज (११ मे) वाढदिवस आहे. ती आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि ग्लॅमरस फोटो- व्हिडीओमुळे चर्चेत राहणाऱ्या अदाला विशेष ओळखीची गरज नाही. अदाने रजनीश दुग्गल स्टारर ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिच्या सिनेकरियरची सुरुवात केली. त्यानंतर, अदाने ‘हसीं तो फसीं’, ‘कमांडो २’, ‘कमांडो ३’ आणि ‘बायपास रोड’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले. अभिनेत्रीने अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अदाने इतक्या चित्रपटांत करूनही, तिला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही.
भारत- पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम, आणखी एक कार्यक्रम आयोजकांकडून स्थगित
२०२३ मध्ये सुदिप्तो सेन दिग्दर्शित, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातून अदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाने तिचे नशीबच पालटले आणि ती रातोरात स्टार बनली. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा २०२३ मधील ‘द केरळ स्टोरी’ हा ड्रामापट अदा शर्माच्या कारकिर्दीसाठी एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून अदाचे करियर वेगळ्या उंचीवर पोहोचले. विपुल अमृतलाल शाह निर्मित, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड हिट झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींच्या आसपास कमाई केली. ‘द केरळ स्टोरी’ हा २०२३ मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानंतर, अदा शर्माचे आयुष्य बदलले.
“जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते”, इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव
‘द केरळ स्टोरी’ ने अदा शर्माला एका रात्रीत प्रसिद्धी मिळवून दिली. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. एका मुलाखतीत अदा म्हणाली होती की, “जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मला स्वत:चा एक सार्थ अभिमान वाटतो. मी स्वत:ला फार मोठी व्यक्ती मानते” या चित्रपटानंतर अदा शर्माला नवीन चित्रपटांच्या अनेक ऑफर येऊ लागल्या. याआधी एका मुलाखतीत अदा म्हणाली होती, “केरला स्टोरी नंतर, मी बऱ्याच गोष्टी करत आहे, ज्या खूप वेगळ्या आहेत. मला आनंद आहे की चित्रपट निर्माते पाहत आहेत की मी वेगवेगळ्या भूमिका करू शकते.”
‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजनंतर, अदा सुनील ग्रोव्हरसोबत ‘सनफ्लावर २’ या वेब सिरीजमध्ये दिसली. ही सीरीज ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. त्या सीरिजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला. या सीरिजचे प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केले. यानंतर, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्यासोबत अदा शर्माचा ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट छत्तीसगडमधील नक्षलवादी बंडावर आधारित आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ सारखा जादू निर्माण करण्यात अयशस्वी ठरला आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.