Kanchi Shinde Shared Experiance Veena Play In Indrayani Serial
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत आता इंद्रायणीचा आता एकच ध्यास आहे आणि तो म्हणजे विठूच्या वाडीत शाळा उघडणे ते पण एका वर्षात. मोहित रावने दिलेले आव्हान इंद्रायणीने स्वीकारले असून आता ते पूर्ण करण्यासाठी फंट्या गँगच्या मदतीने इंदू वर्गणी गोळा करताना दिसणार आहे. पण, यातच मोहितराव इंद्रायणीच्या हातात एक रुपयाचे नाणे ठेवत तिला हिणवलं आणि म्हणाला – “असेच पैसे गोळा केलेस तर होईल शाळा सुरु १०० वर्षांत.” हे मोहितरावाचं म्हणणं इंद्रायणीच्या मनाला खूप लागतं.
आणि इंदू ठरवते शाळा सुरू करण्यासाठी सगळी पंचक्रोशी आता होणार हजर कारण इंदू करणार २४ तास हरी नामाचा गजर! विठूच्या वाडीतील लोकांमध्ये शाळेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी इंदूचा हा अनोखा प्रयोग सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे हे नक्की. आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार? कसे सगळे एकत्र येऊन इंद्रायणीच्या पुढाकाराने शाळेसाठी हे पैसे गोळा करणार? आता इंद्रायणीच्या या प्रयत्नांमध्ये आनंदीबाई, करिष्मा, मोहीतराव कसे अडथळे आणणार? आणि इंदू ते कसे परतवून लावणार?
इंद्रायणी मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कांची शिंदेने शुटिंगचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “या विशेष भागासाठी आम्हां सगळ्यांचाच कस लागला. तीन दिवस शूट सुरु होतं. सगळ्या टीमने थंडी, पाऊस, वारा सगळ्यावर मात करत शूट केले आहे. पहिल्याच दिवशी तुफान पाऊस आला त्यामुळे खूप टेन्शन आलं. सेटवर १७० जणांचा मॉब होता. त्यामुळे खूप प्रेशर होतं. एक क्षण आहे जिथे इंदूला विठुराया दिसतो तो करताना अंगावर काटा आला खरंच सांगते. एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी होती सेटवर, त्याचा आशीर्वाद आहे असं म्हंटल तर काही चूक नाही ठरणार. अक्षरश: सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. आणि माझं म्हणाल तर प्रत्यके शॉटला मला उभं राहावं लागतं होतं खुपचं कठीण होतं सलग २४ तासाचा हरी नामाचा गजर करणं… हे अजिबातच सोपं नव्हतं. आणि जे कीर्तन आहे ते देखील खूप इंटेन्स होतं. माझ्या हातात वीणा आहे ती देखील वजनाने खूप भारी होती, ती जवळजवळ १५ तास हातात घेऊन उभे होते. जी गोष्ट या भागाद्वारे मांडण्याचा इंदूचा प्रयत्न आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे शिक्षण आणि शाळेचे महत्व. जसं मालिकेत इंद्रायणीला महत्वाचे वाटते तसे आम्हांला टीम म्हणून देखील महत्वाचे वाटते ते लोकांपर्यंत पोहचावे. प्रेक्षकांना नक्कीच हा भाग आवडेल याची मला खात्री आहे.”