(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. अलीकडेच तीला‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि २८९८ ए.डी.’ या चित्रपटांच्या सिक्वेलमधून बाहेर करण्यात आलं आहे. यामागचं कारण असं सांगितलं जात आहे की, दीपिकाने चित्रपट निर्मात्यांकडे फक्त ८ तास काम करण्याची अट घातली होती. तीच्या आणि निर्मात्यांमध्ये सहमती न झाल्याने तिलाप्रोजेक्टमधून वगळण्यात आलं.या बातमीनंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली असून, अनेक कलाकार आणि तज्ज्ञ यावर आपलं मत मांडताना दिसत आहेत. दीपिकाच्या या मागणीला अभिनेत्रीकोंकणा सेन शर्माने देखील पाठिंबा दर्शवला आहे.या प्रकरणावर आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे.अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने अलीकडेच एका मुलाखतीत, फिल्म इंडस्ट्रीमधील कामकाजाच्या वेळा आणि कलाकारांच्या आरोग्याविषयी खूप महत्त्वाची भूमिका मांडली.
दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीनंतर सुरू झालेल्या चर्चेवर बोलताना कोंकणा म्हणाली,”जर कामाच्या नियमांमध्ये काही बदल झाले, तर कलाकार ते सहज स्वीकारतात. पण, कलाकारांनाही विश्रांतीची गरज असते.””अनेकदा कलाकार १२ तासांची शिफ्ट फायनल करतात, पण ती वाढून १४–१५ तासांपर्यंतही जाते. अशा परिस्थितीत मानसिक व शारीरिक थकवा होतो, आणि कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो.””इंडस्ट्रीमध्ये कामाचे ठराविक तास असावेत आणि प्रत्येक आठवड्यात एक दिवस संपूर्ण सुट्टी मिळाली पाहिजे. त्यामुळे कलाकार अधिक प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने काम करू शकतील.”कोंकणाच्या या विधानामुळे कलाकारांसाठी कामाचे आरोग्यदायी आणि सुसंगत वातावरण तयार करण्याच्या गरजेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.दीपिकाचा निर्णय वादग्रस्त ठरला असला, तरी अनेक कलाकार आणि प्रेक्षक त्यांच्या बाजूने उभे राहत आहेत, आणि हा विषय केवळ एका अभिनेत्रीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण इंडस्ट्रीसाठी विचार करण्यासारखा मुद्दा ठरत आहे.
‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या कोंकणा सेन शर्मा सध्या त्यांच्या नव्या वेबसीरिज ‘सर्च: द नैना मर्डर केस’ मुळे प्रचंड चर्चेत आहेत. ही सीरिज लोकप्रिय डॅनिश क्राइम थ्रिलर ‘द किलिंग’ चं भारतीय रूपांतर आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवली होती.
‘सर्च: द नैना मर्डर केस’ही वेब सिरीज 10 ऑक्टोबर 2025 रोजी JioHotstar वर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमध्ये कोंकणा सेन शर्माची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे, जी एका किशोरवयीन मुलीच्या हत्येचा तपास करत आहे. या सिरीजचा कथानक ‘The Killing’ या डॅनिश सिरीजवर आधारित आहे